bjp pol khol campaign: कुठल्या तरी गर्दुल्याला किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार हे चालणार नाही, प्रवीण दरेकर यांचा इशारा
bjp pol khol campaign: भाजपच्या पोलखोल कँम्पेन रथावर चेंबूरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
मुंबई: भाजपच्या पोलखोल कँम्पेन (bjp pol khol campaign) रथावर चेंबूरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. कोर्टात जाऊ असं ते म्हणत आहेत. कोणी दगड मारला तर तुम्ही कोर्टात जाता का? या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप (bjp) पुन्हा पोलीस स्टेशनला घेराव घालेल. पोलिसांची भाषा आरोपींना पाठीशी घालणारी आहे, असं सांगतानाच आमचा कोणावर संशय आहे हे राजश्री पलांडे यांनी थेट सांगितलंय. पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. अज्ञाताविरोधात तक्रार दाखल झाली आहे. कुठल्यातरी गर्दुल्याला पकडणार किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार असं चालणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. आमच्या तक्रारीत प्रमुख संशयित आरोपी शिवसेनेचे कार्यकर्ते असतील असा आरोप आम्ही आमच्या जबाबाबत केला आहे. आमच्या स्थानिक माजी नगरसेविका राजश्री पलांडे यांनी संशयितांची नावे दिली आहेत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
मुंबई पालिकेत 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार
पोलखोल रथ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मुंबई पालिकेत 3 लाख कोटीच्या आसपास भ्रष्टाचार झाला आहे. तुमची पोलखोल मुंबईकरांसमोर मांडतोय. गुंड प्रवृत्तीकडून अभियान दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचा हात यात आहे की काय असा संशय आहे. आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशन ला येऊन ठिय्या आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
तर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू
उद्या सीसीटीव्ही गायब झालं असं सांगतील म्हणून आताच अर्ध्या तासात आरोपीला शोधा. नाहीतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू. दंडेलशाहीला दंडेलशाहीनेच उत्तर द्यायची वेळ आणू नये. हा शिवसेनेचा डाव आहे. भ्रष्टाचार समोर येईल अशी भीती त्यांना आहे, असा दावाही त्यांनी केला.
धर्मस्थळ कोणाचेही असो नियम ते नियम
कायदा सुव्यवस्थावर लक्ष हवं. पण मुंबई पोलिसांची प्राधान्यताच वेगळी दिसतेय. राजकीय कार्यक्रम, इफ्तार पार्ट्या यातच ते दंग दिसतात. पोलखोल यात्रेत जर काही झालं तर त्याला पोलीस जबाबदार असतील, असं ते म्हणाले. भोंग्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाष्य केलं. कायदा सर्वांना समान आहे. धर्मस्थळ कोणाचेही असो नियम ते नियम आहेत. लोकांना त्रास होऊ नये असा मध्यम मार्ग काढावा, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Power shortage: दलालीतील टक्केवारीसाठी आघाडीकडून कृत्रिम वीजटंचाई; माधव भांडारींकडून जोरदार हल्लाबोल