मला पोलिसांनी अटक केली, किरीट सोमय्यांचं ट्वीट
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya arrested) यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya arrested) यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. “पोलिसांनी मला निवासस्थानावरुन (होम ऑफिस) निलमनगर, मुलुंड येथून ताब्यात घेऊन अटक केली. आता मला मुलुंड पूर्व येथील नवघर पोलीस ठाण्यात नेले आहे”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं. (Kirit Somaiya arrested)
Police has arrested me from my residential premises/Office from NilamNagar Mulund, and now taken to Mulund East navghar police station
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 8, 2020
याबाबत भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी संताप व्यक्त केला आहे. किरीट सोमय्या हे अनंत करमुसे यांच्या घरी जात होते, त्यामुळे पोलिसांनी रोखल्याचा दावा राम कदम यांनी केला. अनंत करमुसे यांनीच आपल्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या हे अनंत करमुसे यांची भेट घेण्यासाठी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या घरी जाणार होते. मात्र त्यांना रोखण्यात आलं आहे.
यावर भाजप आमदार राम कदम यांनी निषेध व्यक्त केला आहे. “ठाण्यात मारहाण झालेल्या पीडित युवकाची विचारपूस करण्यासाठी निघालेले खासदार किरीट सोमय्या यांना 15 /20 पोलिसांनी घरी जाण्यासाठी मज्जाव करणे, हाऊस अरेस्ट करणे हे कितपत योग्य आहे? ही तर मोगलाई आहे. सरकारच्या या भ्याड कारवाईचा निषेध” असं राम कदम म्हणाले.
तरुणाचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना घरात उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला आहे.
आव्हाडांनी आरोप फेटाळले
“ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) माझ्या माणसांनी मारहाण केली अशी तक्रार केली आहे, त्याला मी ओळखत ही नाही,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
संबंधित बातम्या
त्याला ओळखतही नाही, अभियंत्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फेटाळला