लग्नाच्या नावाखाली घटस्फोटीत महिलांना फसवणाऱ्या ठगाला अटक
विशाल सिंह, टीव्ही 9 मराठी, मुंबई : लग्नाच्या नावाखाली घटस्फोटीत महिलांना फसवणाऱ्या एका सराईत ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुलकर्णी उर्फ मंगेश लाड नावाच्या या व्यक्तीने मॅट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल केली होती. हा मंगेश तिथे येणाऱ्या महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करत असे. आत्तापर्यंत या नराधमाने अनेक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. मेट्रोमोनियल […]
विशाल सिंह, टीव्ही 9 मराठी, मुंबई : लग्नाच्या नावाखाली घटस्फोटीत महिलांना फसवणाऱ्या एका सराईत ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुलकर्णी उर्फ मंगेश लाड नावाच्या या व्यक्तीने मॅट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल केली होती. हा मंगेश तिथे येणाऱ्या महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करत असे. आत्तापर्यंत या नराधमाने अनेक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
मेट्रोमोनियल साईटवर आपली प्रोफाईल काढून त्या संकेतस्थळांवरील घटस्फोटीत महिलांना लुबाडणं हा मंगेश जाधवने स्वतःचा व्यवसायच बनवला होता. आत्तापर्यंत त्याने आठ महिलांना लग्नाचं आमिष दाखवून लाखो रूपयांना फसवल्याचं समोर आलं आहे.
अनेक मोट्रोमोनियल संकेतस्थळांवर या मंगेश लाडने महेश कुलकर्णी नावाने प्रोफाईल बनवलं आहे. या संकेतस्थळांवर येणाऱ्या महिलांना विशेष करून घटस्फोटीत महिला त्याचं लक्ष्य असतात. अशा महिलांना हा मंगेश सुरुवातीला फोन करायचा, त्यानंतर गोड गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा.
आपण एक व्यवसाईक असून आपल्याकडे खुप मालमत्ता असल्याचं तो या महिलांना भासवायचा. एकदा का महिला त्याच्या जाळ्यात अडकली की मग कोणता ना कोणता बनाव करून त्यांना लुबाडायचा. दुर्दैवाने आधिच घटस्फोटीत असलेल्या या महिला आपल्या अब्रूच्या भीतीने साधी तक्रारही करत नसल्याने याचं आजवर फावलं होतं.
काही दिवसांपूर्वी बंगळुरूच्या एका महिलेला त्याने फसवलं. हा तिला लग्नाचं आमिष देऊन तिची क्रेटा गाडी घेऊन पसार झाला. महिलेने पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी बनाव करून त्याला एअरपोर्टला बोलवून घेतलं आणि येताच याच्या मुसक्या आवळल्या.
आपल्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्ग या मंगेश लाडने बंद केले होते. आत्तापर्यंत ना पोलिसांना याचं घर सापडलं आहे, ना कोणती कागदपत्रे. ज्या हॉटेलमध्ये तो महिलांच्या भेटी-गाठी करायचा, तिथे त्याने चांगली ओळख करून घेतली होती. अशा हॉटेलमध्ये ना त्याला कागदपत्रे द्यावी लागायची, ना कोणी त्याची विचारपूस करतं.
त्याने हॉटेलचा सगळा स्टाफ आपल्या बाजूने वळवला होता आणि काही ठराविक हॉटेलमध्ये जात तो आपणच या हॉटेलचे मालक असल्याचं भासवत असे. मोठ-मोठी सोंग घेऊन गोड-गोड बाता मारून तो महिलांना लबाडत असे.