इन्स्पेक्टरची हिंमत, 25 लाखाची लाच मागितली, 22 लाख घेताना सापडला!
मुंबई: स्वतःला नायक म्हणून घेणाऱ्या कोट्याधीश इन्स्पेक्टरला लाचलुचपत पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आनंद भोईर असं या पोलिसाचं नाव आहे. अटक इन्स्पेक्टर हा एका दारुच्या दुकान मालकाकडून 25 लाख रुपयांची लाच मागत होता. त्यातील 22 लाख रुपये घेताना त्याला अटक केली. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत दाखल एका गुन्ह्यात फरार आरोपीला अटक न करण्यासाठी त्याने 25 […]
मुंबई: स्वतःला नायक म्हणून घेणाऱ्या कोट्याधीश इन्स्पेक्टरला लाचलुचपत पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आनंद भोईर असं या पोलिसाचं नाव आहे. अटक इन्स्पेक्टर हा एका दारुच्या दुकान मालकाकडून 25 लाख रुपयांची लाच मागत होता. त्यातील 22 लाख रुपये घेताना त्याला अटक केली. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत दाखल एका गुन्ह्यात फरार आरोपीला अटक न करण्यासाठी त्याने 25 लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे. आरोपी स्वत: कोट्यधीश आहे. मीरा भाईंदरमध्ये तो अनेक अनधिकृत कामं करत असल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
मात्र दुसऱ्यांना अटक करुन तुरुंगात टाकणारा पोलीस निरीक्षक स्वतःच तुरुंगात पोहोचला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, “आरोपी पोलिसाने दुसऱ्या प्रकरणात अटक झालेल्या एका आरोपीकडून बळजबरीने त्यांच्या मुलाचं नाव वदवून घेतलं. त्यानंतर अटक आरोपीसोबत त्यांच्या मुलाला बेड्या घालून, घर आणि दुकानाजवळ फिरवलं. त्यानंतर जर पैसे दिले नाही तर दुसऱ्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली”
सध्या लाचलुचपत विभाग लाचखोर पोलिसाची कसून चौकशी करत आहे.