मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ नाकाबंदीतील पोलिस व्हॅनवर क्वालिस धडकली, महिला पोलीस जखमी

पश्चिम दृतगती महामार्गावर वांद्रे परिसरातील कलानगर ब्रिजजवळ नाकाबंदी सुरु होती (Police Van hit by Qualis WEH)

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ नाकाबंदीतील पोलिस व्हॅनवर क्वालिस धडकली, महिला पोलीस जखमी
पोलिसांच्या व्हॅनला क्वालिसची धडक
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 7:35 AM

मुंबई : भरधाव क्वालिस कारने नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या पोलिसांच्या व्हॅनला जोरदार धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Western Express Highway) कलानगर ब्रिज जवळ ही घटना घडली. यामध्ये पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेली महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे. (Police Van at Naka Bandi near CM Uddhav Thackeray Kalanagar Residence hit by Qualis Car at WEH)

कलानगर ब्रिजजवळ नाकाबंदी

पश्चिम दृतगती महामार्गावर वांद्रे परिसरातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान मातोश्री बंगल्यापासून काही अंतरावर असलेल्या कलानगर ब्रिजजवळ नाकाबंदी सुरु होती. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या पोलिसांच्या व्हॅनला भरधाव क्वालिस कारने जोरदार धडक दिली. MH 04 BK 1994 क्रमांकाची क्वालिस बोरिवलीहून दक्षिण मुंबईच्या दिशेने चालली होती.

भरधाव क्वालिस पोलिस व्हॅनवर आदळली

कलानगर ब्रिजजवळ नाकाबंदी असल्याने सर्व वाहनांनी वेग कमी केला होता. मात्र भरधाव क्वालिसला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती थेट पोलिसांच्या व्हॅनवर जाऊन धडकली.

क्वालिसचा चेंदामेंदा, महिला पोलीस जखमी

या अपघातात क्वालिस कारचा चक्काचूर झाला आहे. मात्र या घटनेनंतर ड्रायव्ह कार तिथेच सोडून घटनास्थळावरुन पसार होण्यास यशस्वी ठरला. तर पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेली महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Police Van hit by Qualis WEH)

अपघाताचं कारण अस्पष्ट

वांद्र्यातील खेरवाडी पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झालेल्या वाहन चालकाचा शोध सुरु आहे. ही घटना गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे घडली, की अपघाताच्या वेळी कार ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता, हे त्याचा शोध लागल्यानंतर समजू शकण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या :

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एसटी उलटली, चालक पसार, कंडक्टर ताब्यात

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

(Police Van at Naka Bandi near CM Uddhav Thackeray Kalanagar Residence hit by Qualis Car at WEH)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.