राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी काय समीकरणं असतील. तिथे कोण फोडता येईल याची महाविकास आघाडीने चाचपणीच नाही तर प्रयोग पण सुरू केले आहे. त्यामुळे महायुतीची अनेक मतदारसंघात डोकेदुखी वाढणार आहे. भाजपातील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू आहे. त्यांना थोपवून ठेवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. त्यातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या या बड्या नेत्याने मात्र एकच खळबळ उडून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी त्याने बाप्पालाच साकडे घातले आहे.
येणारे सरकार महाविकास आघाडीचे
येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे, तर फोडाफोडीच्या राजकारणाला पण जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार पुढचं येईल गणरायाकडेही मी साकडं घातलं आहे, असे वक्तव्य करुन एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
भाजप पक्ष प्रवेशाचं भिजत घोंगडं
एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये यायचे आहे. पण त्यांचा अद्याप प्रवेश झालेला नाही. लोकसभेपूर्वीपासून ते भाजपमध्ये येण्याची तयारी करत आहे. याविषयीचा खुलासाच त्यांनीच अनेकदा केला. लोकसभा निवडणुकीनंतर ते दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले. तेव्हा त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानण्यात येत होता. त्यानंतर आता लखपती दीदी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव येथे आले. तेव्हा त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली. पण या कार्यक्रमाला साधं निमंत्रणही त्यांना पाठवण्यात आलं नसल्याचा आरोप खडसे यांनी केला. त्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी जाहीर केली.
भाजपमधील खानदेशच्या धुरंधरानी त्यांच्या पक्ष प्रवेशावर चिमटे काढल्यानंतर आता खडसे यांचा भाजपतील पक्ष प्रवेश बारगळल्याचे स्पष्ट झाले. तर खडसे यांनी सुद्धा एका मर्यादीत वेळेनंतर आपण राष्ट्रवादीचे काम जोरदारपणे करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एकूणच चित्र स्पष्ट झाले. येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने त्रस्त आहे, तर फोडाफोडीच्या राजकारणाला पण जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार पुढचं येईल गणरायाकडेही मी साकडं घातलं आहे, असे त्यांचे वक्तव्य हे त्याचेच द्योतक वाटत आहे.