दलित पँथरची शिंदे गटाला साथ, पण कोणत्या गटाची..?

दलित पँथर आता शिंदे गटासोबत युती करणार असल्याचं एका गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दलित पँथर नेमकी कुणाची यावरुन आता पँथरच्या दोन गटांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.

दलित पँथरची शिंदे गटाला साथ, पण कोणत्या गटाची..?
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 11:14 PM

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी करुन वेगळी चूल मांडणाऱ्या शिंदे गटामुळे राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यातच आता राज्यातील वेगवेगळे गट शिंदे गटाकडे जात असल्याने वेगवेगळी मतमतांतरी व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचेही चित्र दिसून येते आहे. हे चित्र अधिक गडद होत असतानाच दुसरीकडे दलित पँथर आता शिंदे गटासोबत युती करणार असल्याचं एका गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दलित पँथर नेमकी कुणाची यावरुन आता पँथरच्या दोन गटांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे नवनव्या युती-आघाड्यांचा जन्म होऊ लागला आहे.

त्यातच शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटानं संभाजी ब्रिगेडसोबत युती केली तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीनेसुद्धा ठाकरे गटासोबत येण्याची चिन्हं असल्याचे बोलले जात आहे. तरpolitical equation will change as a group from the Dalit Panthers goes with the Shinde group आठवलेंचा रिपाइं गट भाजपसोबत महायुतीत आहे. त्यामुळे हे विविध गट कुठे ना कुठे आता असे विभागले गेले आहेत.

त्यापार्श्वभूमीवर आता शिंदे गट आणि दलिथ पँथर या संघटनेत राजकीय मैत्रीची चर्चा सुरु झाल्याने राजकीय आगामी निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

येत्या 25 नोव्हेंबर रोजी कराडमध्ये दलित पँथरच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होणार आहे. याच बैठकीत दलित पँथरकडून शिंदे गटासोबत युती होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

दलित पँथरशी युती झाली तर शिंदे गट ठाकरे-आंबडेकरांच्या संभाव्य युतीला शह देणार असल्याचंही बोलले जात आहे. मात्र सध्या दलित पँथरची राजकीय ताकद महाराष्ट्रात फारशी नसल्याचेही दिसून येत आहे.

दलित चळवळीतून पुढे आलेल्यांपैकी महाराष्ट्रात राजकीय जनाधार प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला आणि रामदास आठवले यांच्या रिपाइं गटाला आहे.

त्यामध्ये वंचित आघाडीनं दलितांसोबत बहुजन वर्गाला सोबत घेतल्यामुळे अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये वंचित आघाडी वरचढ ठरल्याचे चित्र आहे. म्हणून दलित पँथरचा शिंदे गटाला किती फायदा होणार आहे हे आता आगामी निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

कारण दलित पँथरने अनेक वर्षांपासून निवडणुका लढवलेल्या नाहीत, त्याबरोबरच या घडीलाही दलित पँथरमध्येच दोन ते तीन गट अस्तित्वात असल्याने राजकीय भूमिका काय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कधीकाळी नामदेव ढसाळांनी उभी केलेली दलित पँथर ही शिवसेनेसोबत असायची. मात्र नंतरच्या काळात वैचारिक मतभेदांमुळे दलित पँथर अनेक गट-तटांमध्ये विखुरली गेली.

त्यामुळे आगामी निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीत दलित पँथरमुळे शिंदे गटाला किती फायदा होणार हे आता थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.