VIDEO : माझी बहीण वाघीण होती, ती आत्महत्या करुच शकत नाही, पूजाच्या बहिणीची पहिली प्रतिक्रिया
तिचे पर्सनल फोटो व्हायरल करणं हा कोणाचाही हक्क नाही, असे दिया चव्हाण म्हणाली. (Pooja Chavan Sister Dia Chavan First Comment)
बीड : “माझी बहीण वाघीण होती. ती आत्महत्या करुच शकत नाही, या पोस्टवर मी आताही ठाम आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, पण बदनामी नका. जर पुढे त्रास वाढला तर मी ही आत्महत्या करेन,” अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणची बहीण दिया चव्हाण हिने दिली. टीव्ही 9 मराठीशी बोलताना दियाने याप्रकरणी आपले मत मांडले. (Pooja Chavan Sister Dia Chavan First Comment)
पूजा चव्हाणच्या बहिणीची प्रतिक्रिया
माझी बहिण वाघीण होती. ती आत्महत्या करुच शकत नाही, या पोस्टवर मी आताही ठाम आहे. पण हा प्रकरणी कोणासोबत नाव जोडणेही योग्य नाही. माझी बहिण प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली होती. ते फोटो तुम्ही का व्हायरल करत नाही. कारण ते पुरुष नाही यासाठी ??? माझी बहिण कार्यकर्ती होती, ते पूर्ण बीडला माहिती आहे. पण तिचे कोणासोबत नाव जोडणं योग्य नाही. तसेच तिचे पर्सनल फोटो व्हायरल करणं हा कोणाचाही हक्क नाही, असे दिया चव्हाण म्हणाली.
माझी बहिण जगात नाही, म्हणून आम्हाला आधीच फार त्रास होत आहे. त्यात तुम्ही नवनवीन काहीतरी नाव जोडून समोर आणतं आहात. ते त्रास आम्हाला समोर होत नाही. विरोधक आरोप करत आहेत. पण ते प्रसारमाध्यमांवरही अवलंबून आहे की तुम्ही काय दाखवायचे काय नाही. तुम्ही सहज एका पोरीची बदनामी करत आहात. ती पण कोणाची तरी लेक होती.
जे काही आहे ते पोलीस बघतील, त्यात आम्ही काहीही बोलू शकत नाही. कोणावर आरोप करणं बरोबर नाही. कारण आम्हाला काहीही माहिती नाही. मी सध्या दहावीला आहे. नेहमी नेहमी माझ्या बहिणीबद्दल बदनाम केलं जात आहे. जर पुढे त्रास वाढला तर मी आत्महत्या करेन. याची चौकशी झाली पाहिजे पण बदनामीसोबत चौकशी होऊ नये, असे दिया चव्हाणने सांगितले. (Pooja Chavan Sister Dia Chavan First Comment)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?
मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.
पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?
पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही. (Pooja Chavan Sister Dia Chavan First Comment)
संबंधित बातम्या :
पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार