खड्डे दाखवा, पैसे कमवा*, मुंबई महापालिकेच्या ऑफरमागे तीन अटी

एक फूट लांब आणि तीन इंच खोल असलेल्या खड्डयाचा फोटो काढून पालिकेच्या खड्ड्यांच्या ट्रॅकिंग अॅपवर पाठवायचा, अशी बीएमसीची अट आहे

खड्डे दाखवा, पैसे कमवा*, मुंबई महापालिकेच्या ऑफरमागे तीन अटी
Follow us
| Updated on: Nov 01, 2019 | 7:50 AM

मुंबई : मुंबईमध्ये खड्डे नसल्याचा दावा महापालिकेकडून वारंवार केला जातो. त्यातच बीएमसीने रस्त्यावर ‘खड्डे दाखवा आणि पैसे कमवा’ अशी योजना सुरु करण्याचा निर्णय (Pothole Reward by BMC) घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून (1 नोव्हेंबर 2019) केली जाणार आहे. मात्र खड्ड्याच्या आकारमानाबाबत अटी-शर्थी लागू करुनच ही योजना प्रत्यक्षात उतरणार आहे.

मुंबई महापालिका रस्ते बांधणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचा अनुभव प्रत्येक मुंबईकराने घेतला आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.

कधी हॉटमिक्स तर कधी कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवल्याचा दावा केला जातो, मात्र रस्त्यावर खड्डे आहेत तसेच पुन्हा दिसतात. खड्डे ट्रॅकिंग अॅप, व्हॉट्सअॅप, ट्विटर अशा विविध सोशल मीडियांतून मुंबईच्या रस्त्यावर पडलेले खड्डे पालिकेला दाखवा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे आजही तसेच असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने नागरिकांना खड्डे निदर्शनास आणण्याचे आवाहन केले आहे. एक फूट लांब आणि तीन इंच खोल असलेल्या खड्डयाचा फोटो काढून पालिकेच्या खड्ड्यांच्या ट्रॅकिंग अॅपवर पाठवायचा आहे.

हा खड्डा 24 तासात बुजवला गेला नाही, तर संबंधित विभाग कार्यालयाने खड्डा निदर्शनास आणणाऱ्या नागरिकाला 500 रुपये द्यायचे आहेत. पालिका आयुक्तांनी सर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना असा संदेश पाठवला आहे.

पाचशे रुपये कमवण्यासाठी महापालिकेच्या अटी कोणत्या?

-मुंबईकरांनी दाखवलेला खड्डा कमीत कमी 1 फूट लांब आणि 3 इंच खोल पाहिजे

-तक्रारीनंतर 24 तासांत खड्डा भरला गेला, तर पैसे मिळणार नाहीत.

-खड्डे दाखवा, पैसे मिळवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘My BMC pothole fixlt’ या अॅपवर जाऊन खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल

दरम्यान, पालिका प्रशासन खड्डे बुजवण्यात फेल ठरल्यानेच अशी योजना आणली असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. मुंबईत 20 हजार खड्डे आहेत. या खड्ड्यांसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागणार आहेत, त्याची पालिकेने तरतूद केली आहे का? याचा स्थायी समितीच्या बैठकीत जाब विचारणार असल्याचं विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी सांगितलं.

पालिका अधिकारी काम करत नाहीत, असा विश्वास झाल्याने आता नागरिकांकडून खड्ड्यांची माहिती प्रशासनाला मागवावी लागत आहे. कंत्राटदारांनी जे रस्ते बांधले त्याचा हमी कालावधी बाकी असताना रस्त्यावर खड्डे पडल्याने पालिकेच्या दक्षता विभागाने सर्व कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावरुन काम योग्य प्रकारे झाले नाही हे सिद्ध झाले आहे. खड्डे बुजवण्यासाठी जाहीर केलेल्या इतर योजनांप्रमाणे ही योजना सुद्धा फेल जाणार आहे. यामुळे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून खड्डे बुजवण्याची गरज (Pothole Reward by BMC) असल्याचं मतही रवी राजा यांनी व्यक्त केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.