राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा पोलिसांना हात लावून दाखवा, मी कुणालाच सोडणार नाही, सुप्रिया सुळे आक्रमक

Supriya Sule | शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर चांगलेच तोंडसूख घेतले. राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये बेबनाव आहे. कॅबिनेटमधील वाद आता मीडियासमोर मांडल्या जात आहे. हे सरकार लोकांना केवळ आंदोलनात अडकून ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा पोलिसांना हात लावून दाखवा, मी कुणालाच सोडणार नाही, सुप्रिया सुळे आक्रमक
Supriya Sule Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 11:46 AM

अभिजीत पोते, प्रतिनिधी, मुंबई | 7 जानेवारी 2024 : सत्ता ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मीटिंग घेण्यासाठी आणि भांडण्यासाठी नसते तर ती विकासासाठी असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला. कॅबिनेटमध्ये भांडणं होत आहेत. आरक्षणावर मंत्री भांडत आहेत. कॅबिनटेमधील हे वाद चव्हाट्यावर येतात. मीडियासमोर ते येतात. राज्यात अनेक प्रश्न आहेत. पण हे सरकार आपल्याला आंदोलनात अडकवत असल्याचा घणाघात त्यांनी केला.  त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर पण टीका केली.

मग पाकिस्तानचा कांदा कसा चालतो?

त्यांनी केंद्र सरकारवर पण तोफ डागली. शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवला तर आमचं निलंबन केलं गेलं. माझ्यासारखा संसदेत कोणाचा रेकॉर्ड नाही आणि यांनी मला निलंबीत केलं. संसदेत सगळ्यात जास्त काम मी करते कुणालाही विचारा असे त्या म्हणाल्या. एरवी हे लोक सगळ्यांना तुम्ही देशद्रोही आहात पाकिस्तानला जा म्हणतात मग यांना पाकिस्तानचा कांदा कसा काय चालतो? असा रोकडा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

प्रश्नचंद पार्टीला एक सवाल

आजचा भाजप हा भ्रष्ट आणि जुमलेबाज आहे. माझा प्रश्नचंद पार्टीला एकच सवाल आहे की तुम्ही तुमच्या लोकांवर आरोप झाल्यावर कारवाई करणार की नाही. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ते भ्रष्टाचारी होते की नाही. तुम्ही स्वतः च्या राजकारणासाठी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेय अनेक आरोप 2014 मध्ये आमच्यावर लावले त्याच पुढं काय झालं. कोळसा घोटाळ्याचे आरोप आमच्यावर करण्यात आले. या 10 वर्षात त्याचं काय झालं, असा सवाल करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

मी कुणालाही सोडणार नाही

पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका जबाबदार व्यक्तीला शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. वर्दीला काही मान सन्मान आहे. पोलिसासह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारण देखील चुकीचं असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या माणसाने पोलिसांना मारलं आता यशवंतराव चव्हाण असते तर तातडीने त्यांच्यावर ॲक्शन घेतली असते आजच्या मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घ्यायला हवी.आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा पोलिसांना हात लावून दाखवा मी कुणालाच सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मंत्रालयात शुकशूकाट

शासन आपल्या दारीवर राज्य सरकार खर्च करत आहे. एक कोटी रुपये एका कार्यक्रमाला लावतात कशाला एवढा खर्च करतात. आज आपले मुख्यमंत्री कार्यक्रम घेऊन जातीचे दाखले वाटत आहेत हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. मंत्रालयात कधीही जा शुकशुकाट असतो. मंत्री कुठे जातात तेच कळत नाही. मंत्रालयात कोणी दिसत नाही, अशी टीका ही त्यांनी केली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.