Mumbai Power Outage : मुंबईतल्या अनेक भागात बत्ती गुल, ऐन उन्हाळ्यात लोकांचे हाल, काही वेळानंतर वीज पुरवठा सुरळीत

परेल आणि धारावीत स्थित टाटा पॉवर विद्युत केंद्रमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या तांत्रिक बिघाडामुळे यावर अवलंबून असणाऱ्या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. आता मात्र हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून या भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai Power Outage : मुंबईतल्या अनेक भागात बत्ती गुल, ऐन उन्हाळ्यात लोकांचे हाल, काही वेळानंतर वीज पुरवठा सुरळीत
दादरसह आजुबाजुच्या परिसरात काही काळ वीजपुरवठा खंडीत, आता पुन्हा सुरळीतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:40 PM

मुंबई : सध्या उन्हाळ्याचे (Summer Heat) दिवस सुरू आहेत. अशात मुंबईसारख्या शहरात (Mumbai Power Outage) काही मिनिटेही पंख्याविना राहणे म्हणजे मोठे आव्हान आहे. मात्र अशा परिस्थित मुंबईतल्या काही भागातील बत्ती पुन्हा गुल (Electricity) झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. बत्ती गुल झालेल्या भागात दादर , वडाळा , प्रतीक्षानगर आणि जवळपासच्या परिसराचा समावेश होता. त्यामुळे काही मिनिटं का होईना या भागातील लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. परेल आणि धारावीत स्थित टाटा पॉवर विद्युत केंद्रमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या तांत्रिक बिघाडामुळे यावर अवलंबून असणाऱ्या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. आता मात्र हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून या भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही काळ तरी ऊर्जा विभागाची मोठी धावपळ झाल्याचे दिसून आले.

तात्काळ दुरुस्तीचे काम

या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर हा प्रकार विभागाच्या लक्षात आला आणि त्यांनी तातडीने बिघाड शोधून दुरुस्तीसाठी तातडीने पाऊलं उचलली. त्यानंतर धारावी , दादर आणि काही ठिकाणी विद्युत पुरवठा हा तात्काळ सुरू करण्यात आला. या काळात बेस्टला टाटा पॉवरकडून विद्युत पुरवठा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. टाटा पॉवर आणि बेस्ट या मुंबईला वीज पुरवठा करणारे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. मात्र या ठिकाणीच बिघाड झाल्यास त्याचा त्रास हा मुंबई करांना सहन करावा लागतो.

वीज पुरवठा खंडीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही

मुंबईतला काही भागातील वीजपुरवठा खंडीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वीज पुरवठ्यात बिघाड होण्याचा फटका सर्वसमान्य मुंबईकरांनी अनेकदा सोसला आहे. वीज पुरवठा खंडीत होण्याचा फटका अनेक मुंबईकरांच्या लोकलला आणि उद्योगधंद्यांनाही बसला आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहे. मुंबई हे दाटीवाटीने वसलेले शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी काही मिनिटं जरी वीजपुरवठा खंडीत झाला तर त्याचा मोठा फटका सर्वसमान्य मुंबईकरांना बसोत. अनेक उद्योगही वीजेवर चालत असल्याने त्याचा फटका रुग्णलयांना आणि उद्योगांनाही बसतो. हे आधीही अनेकदा मुंबईकरांनी बघितलं आहे. त्यामुळे आगामी काळात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पाऊलं उचलण्याचीही तितकीच गरज आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.