शाईन बागच्या धर्तीवर महाराष्ट्रात किसान बाग आंदोलन होणार, वंचितची मोठी घोषणा
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभर किसान बाग आंदोलन करण्याची घोषणा केलीय.
मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक बिल रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मागील 2 महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार कुठल्याही परिस्थितीत हे बिल रद्द करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येतंय. आज (26 जानेवारी) दिल्ली तसेच आसपासच्या परिसरात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभर किसान बाग आंदोलन करण्याची घोषणा केलीय. देशात शाईन बाग आंदोलन झालं तसंच महाष्ट्रात किसान बाग आंदोलन करण्याचा वंचितचा संकल्प आहे (Prakash Ambedkar comment on Delhi Farmer Tractor rally and Kisan Bag Protest).
असं असलं तरी मुंबईतील वंचितच्या किसान बाग आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. हे आंदोलन शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी असल्याने कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करण्याचा निश्चय वंचित बहुजन आघाडीने केलाय. मुंबई आंदोलन संपन्न झाले त्या नागपाडा, आरबिया हॉटेलजवळ बुधवारी (27 जानेवारी) वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते आणि मुस्लीम बांधव एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करतील, अशी आशा वंचितने व्यक्त केलीय.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीतील शाईन बाग आंदोलनासारखं राज्यात किसान बाग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या आंदोलनासाठी अनेक मुस्लीम संघटनांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय. राज्यभर हे आंदोलन होणार असून शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग असे आंदोलनाचे स्वरूप असेल. राज्यभरातील लाखो मुस्लीम बांधव या आंदोलनात उतरणार आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन होणार असून या आंदोलनाची पूर्व परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली होती. मात्र ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर वंचितने पोलिसांना हे आंदोलन होऊन द्यायचे नसल्याचे दिसन असल्याचा आरोप केलाय. केंद्रात बीजेपी सरकारने ज्याप्रकारे हे आंदोलन संपवण्याचा घाट घातला, तशाच प्रकारे हे आघाडी सरकार शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याऐवजी शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचा डाव रचत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी कुठल्याही परिस्थितीत किसान बाग आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नागपाडा, आरबिया हॉटेल या ठिकाणी बुधवारी (27 जानेवारी) सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते आणि मुस्लीम बांधव एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने दिलीय.
हेही वाचा :
शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा नेमका कशाचा?
हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य, इतकं निर्लज्जपणे कसं बोलू शकतो, भाई जगताप कडाडले
Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?
व्हिडीओ पाहा :
Prakash Ambedkar comment on Delhi Farmer Tractor rally and Kisan Bag Protest