Tv9 स्पेशल रिपोर्ट ! प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना ओलांडला सर्व मर्यादा, म्हणाले..

प्रकाश महाजन यांनी पक्षाच्या 'घे भरारी' अभियानात भाषण केलं. पण या भाषणात त्यांनी सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका करताना पातळी सोडली.

Tv9 स्पेशल रिपोर्ट ! प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्याविषयी बोलताना ओलांडला सर्व मर्यादा, म्हणाले..
prakash mahajanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:55 PM

मुंबई : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाच्या ‘घे भरारी’ अभियानात भाषण केलं. पण या भाषणात त्यांनी सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका करताना पातळी सोडली. प्रकाश महाजन काय म्हणाले. पाहुयात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सध्या घे भरारी अभियान सुरु आहे. या अभियानादरम्यान बोलताना प्रकाश महाजन यांची जीभ चांगलीच घरसलीय. प्रकाश महाजन सुषमा अंधारेंविषयी बोलत होते. पण बोलताना त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या.

बाईट- सुषमा अंधारे…दसऱ्याचं भाषण झाल्यावर पत्रकाराचा फोन आला..आम्ही विचार करत बसलो. सुषमा अंधारेला तोंड कोण देऊ शकतो. ते म्हणले प्रकाश महाजन तोंड देऊ शकतो..मी त्याला म्हटलं..आरे या वयात घरी तोंड देता देता बेजार..या बाईला कुठं तोंड देता. पुन्हा हिला पायाखाली स्टूल घ्यावा लागतो.

सुप्रिया सुळेंच्या एका भाषणाचा दाखला देतही महाजन यांनी सुषमा अंधारेंनाच टार्गेट केलं. ((बाईट- प्रकाश महाजन..सुप्रियाताई सुळेचं एक भाषण आहे…बाप पळवणारी टोळी आली म्हणले बायकांनो सांभाळून राहा..आता कोण यांना पळवून नेईल सांगा..उद्या सुषमा अंधारे म्हणली तरी तिला कोण नेईल सांगा))

आदित्य ठाकरेंवर बोलतानाही महाजन यांनी दिशा पटनीचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आणि आदित्य ठाकरेंचं लग्न होत नसल्यानंच त्यांची चलबिचल होत असल्याची टीका केली.

((बाईट- प्रकाश महाजन..ते आमचे आदित्य ठाकरे…मी बऱ्याच वेळेला म्हणतो..याचं वेळेवर लग्न लावायला पाहिजे..लग्न नाही केलं ना..माणसाची गडबड होते..प्रत्येक सभेत म्हणतो 32 वर्षाचा झालो 32 वर्षाचा झालो..आरं तू 32 वर्षाचा झाला..तुझ्या आईबापाला नाही ना वाटतं. त्याला आम्ही काय करावं अजूनही लहान पोरासारखं तुला मध्ये घेऊन झोपत असतील अजूनही आईबापाला सांगतो. 32 वर्षाचा झालो..माझं काहीतरी बघा.. दिशा गेली पटन्याला माहित नाही.

पुन्हा आलीच नाही इकडं..मी म्हणले ठीक आहे. तुझे आईबाप नाही म्हणतायत..तर आमच्याकडे ये..चुलता लावून टाकेल लग्न..त्याच्यात काय..माणसाचं कसं आहे. चलबिचल होतं ना माणूस नाहीतर मग काय करतं ते..कबड्डीत वाईड बॉल टाकतं. महाजनांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली पण रश्मी ठाकरेंचा त्यांनी करीना असा उल्लेख केला.

प्रकाश महाजन- यांचा तो पाळलेला पत्रकार..त्यानं प्रश्न विचारला..तुमच्यासमोर काय समस्या उभा राहिल्या..राज्य करताना..मुख्यमंत्र्यानं सांगितलं..मी आजारी पडलो..माझ्या मणक्याचं ऑपरेशऩ झालं..सुन्न पडलं..मला काळजी लागली..संदीप म्हणून गेला..कोरोनाच्या काळात घरी बसले..बरोबर आहे ना..कोरोनाच्या काळात आपल्या करीनासोबत घरात बसले.

उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आजारपणावरुनही त्यांनी टीका केली. या दोघांचा डॉक्टर नरेंद्र मोदी असल्याचं सांगत मोदींची स्तुती केली.

प्रकाश महाजन- मला तर काल एक बातमी मिळाली अशी की केजरीवाल यांना भेटायला येणार आहे. तरी म्हणलं, मला खोकला कसा..केजरीवाल येणार..त्यामुळं वातावरण बिघडलं कसं..त्याला खोकला, यांना मणक्याचा आजार, या दोघांचा डॉक्टर एक..नरेंद्र मोदी.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर बाप चोरणारी टोळी अशी टीका केली होती. ठाकरेंची टीका होती. शिंदे गटावर त्यामुळं शिंदे गटानंच यावर प्रत्युत्तर देणं अपेक्षित होतं. पण ती भूमिकाही मनसेच्या प्रकाश महाजनांनी चोख बजावली.

प्रकाश महाजन- माझा बाप चोरला..माझा बाप चोरला…अरे लौकिकदृष्या तुझे वडील आम्हाला मान्य आहे..पण हिंदूहृदयसम्राट आमचे बाप आहेत ना..त्यांना कोण चोरणार आहे..माझा बाप चोरला..माझा बाप चोरला..मी नेहमी प्रश्न विचारतो..ते अजून उत्तर देत नाहीत. ज्या बापाच्या नावावर एवढं मिळवलं..2005 च्या महापुरात बापाला कुठं सोडून गेला होतास सांग ते कुठलं हॉटेल होतं.

प्रकाश महाजन यांचा बोलण्यातला शिवराळपणा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि तोही पक्षाच्या ‘घे भरारी’ अभियानात. महाजनांसारख्यांची ही ‘मधुर वाणी’ अशीच कायम राहिली..तर नवनिर्माणाचं स्वप्न पाहणारा त्यांचा पक्ष ‘भरारी ‘ कशी घेणार हाच प्रश्न आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....