मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सुपुत्र प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Maharashtra Chief Ministers Relief Fund) मदत म्हणून देऊ. इतकंच नाही तर स्वतःच्या लसीचे पैसे आणि आणखी पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देण्याचा निर्णय प्रतीक पाटील यांनी घेतला. (Pratik Patil son of Minister Jayant Patil decided to donate vaccination amount to Maharashtra Chief Ministers Relief Fund)
महाराष्ट्रात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या किमती 400 ते 600 रुपये आहेत. मात्र राज्य सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती देताना 6500 कोटी रुपये लसीकरणावर खर्च करणार असल्याचं सांगितलं. अशा परिस्थितीत आधीच राज्य सरकारची परिस्थिती बिकट असल्यामुळे, आता अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत.
ज्यांना विकत लस घेणे परवड आहे, ते नागरिक लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत. त्यामध्ये आता प्रतीक पाटील यांचीही भर पडली आहे. प्रतीक पाटील यांनी राज्यातील तरुणांनाही याबाबत आवाहन केलं आहे.
“आपल्याला शक्य असेल तर आपणही लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून द्या. आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदतीचा हातभार लावण्याची सध्या गरज आहे. देशाप्रती, राज्याप्रती असलेली जबाबदारी म्हणून ही भूमिका घेत आहे”, असं प्रतीक पाटील म्हणाले.
प्रतीक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत.
महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. (Maharashtra Free Corona Vaccination Drive 18 plus Citizens to get free COVID vaccine) महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे.
संबंधित बातम्या
Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिंग? प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चात
(Pratik Patil son of Minister Jayant Patil decided to donate vaccination amount to Maharashtra Chief Ministers Relief Fund)