मुंबईः पदवीधर मतदार संघाच्या आणि धनुष्यबाणाच्या न्यायालयीन लढाईमुळे शिंदे गटाकडून खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेतून आमदार निघून गेल्याचा आरोप केला आहे तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्याकडे काहीच मालमसाला नसल्यामुळे ते शोधून बघता आहेत अशी जहरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
मागील दोन दिवसांपासून संजय राऊत यांना शिंदे गटाकडून लक्ष्य केले जात असून त्यांच्या एकेरी भाषेतही टीका केली जात आहे. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी चिघळणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
खासदार संजय राऊत काय बोलला आणि काही नाही, संजय राऊतकडे काही मालमसालाच राहिला नाही. त्यामुळे ते शोधून शोधून बघत आहेत.
एक एक दमत चाललेले आहेत तर एक थकत चालले आहेत अशी टीका ठाकरे गटावर करण्यात आली आहे. त्यामुळे हा भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
त्यातच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या बांद्रा येथील त्यांच्या कार्यालयावर म्हाडाकडून कारवाई करण्यात आल्याने हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे दिसत आहे.
तर संजय राऊत यांच्याकडून काहीही टीका केली जात असली तरी काळजी करायचं कारण नाही. कारण संजय राऊत काहीही बोलू द्या त्याच्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही अशा एकेरी शब्दात भरत गोगावले यांनी टीका केली आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गट आता अनेक मुद्यांवर एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच शिंदे गटाने उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या तीन नेत्यांवर वारंवार टीका केली जात असून खालच्या पातळीवर त्यांच्याकडून टीका केली जात आहे.