मातोश्रीला गेली 25 वर्षे टक्केवारीचा अनुभव; भाजप नेत्याने ठाकरे घरण्यावर तोफ डागली…
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर यावेळी प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा टक्केवारीचा उत्तम अभ्यास आहे.
मुंबईः सध्या मुंबईसारख्या विभागामध्ये कोकणी महोत्सव होत असला तरी तो कायम स्वरूपी आणि मोठा उत्साहात व्हावा अशी इच्छा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. हा महोत्सव नसून याचा कायम स्वरूपाचा बाजार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
ज्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाव मिळेल आणि कोकणाचा विकास होईल अशी इच्छाही यावेळी प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे असल्याचे मतही प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
बीडीडी चाळ याविषयी मत व्यक्त करताना त्यांनी कोळंबकरांची मागणी रास्त असल्याचे सांगत त्यांनी बीडीडी चाळ विकासाकरिता मोठी मेहनत घेतली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर यावेळी प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा टक्केवारीचा उत्तम अभ्यास आहे. त्यांच्याकडे कंत्राटदारांचीच यादी असून गेल्या 25 वर्षापासून मातोश्रीला टक्केवारीचा अनुभव असल्याचा जोरदार हल्लाबोल त्यांना यावेळी केला
आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे आदित्य ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. शिंदे-फडणवीस यांच्या योग्य कामामुळे मुंबई आपल्या हातातून जाते का याची काळजी त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते शिंदे-फडणवीस गटावर वारंवार टीका करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतान त्यांना शिंदे-फडणवीस गटाचे कौतूकही केले आहे. त्यांच्यामुळेच ठाकरे गट अस्वस्थ झाला असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिंदे-फडणवीस सरकार बाजी मारणार आहे. त्यामुळेच ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतान त्यांनी त्यांच्या राजकारणाविषयीही कौतूक केले. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीविषयी आणि काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्याविषयी बोलताना त्यांनी सत्यजित तांबे यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाविषयी बोलताना चांगले सुशिक्षित तरुण वरच्या सभागृहामध्ये येणे गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.