मुंबई : मागील सरकारच्या काळात मोठा त्रास झाला असे वक्तव्य डॉ. तात्याराव लहाने यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मात्र, डॉ. तात्याराव लहाने ( Tatyarao Lahane) यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केलीये. “प्रशासनाच्या एका वरिष्ठ पदावर रुजू असताना तात्याराव लहाने यांनी प्रशासनाच्या अंतर्गत वादाला माध्यमांसमोर आणणे योग्य नाही,” असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सत्त्कार स्वीकारण्यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे 30 जानेवारी रोजी अहमदरनगरमध्ये आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना मागील सररकारच्या काळात मी मोठा त्रास सहन केला, असं म्हणून त्यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. लहाने यांच्या याच विधानावर बोलताना दरेकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Pravin Darekar criticizes Tatyarao Lahane on criticizing previous BJP government)
“प्रशासन आणि शासनात कुणीही कुणाला त्रास देऊ नये. सलोख्याने प्रशासन चालावं असं सर्वांना अपेक्षित असतं. डॉ. तात्याराव लहान हे एका वरिष्ठ पदावर रुजू आहेत. त्यांनी प्रशासन आणि शासन यांच्यातील अंतर्गत वादाला माध्यमांसमोर आणणे योग्य नाही,” असे प्रविण दरेकर म्हणाले.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने अहमदनगर येथे आले होते. यावेळी लहाने यांनी धनंजय मुंडें यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. यावेळी बोलताना लहाने यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. मागील सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला, असं वक्तव्य लहाने यांनी यावेळी बोलताना केले होते.
“धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन,” असे डॉ. तात्याराव लहाने म्हणाले होते.
शरद पवार कोणतीच गोष्ट सहज घेत नाहीत, माझंही पुस्तक चाळतील; प्रवीण दरेकरांना विश्वास#sharadpawar #pravindarekarhttps://t.co/VyBXn7zGZP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 31, 2021
संबंधित बातम्या :
(Pravin Darekar criticizes Tatyarao Lahane on criticizing previous BJP government)