मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाच अर्थ काय?; प्रविण दरेकरांनी मांडल्या दोन थिअरी!
मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलं. (pravin darekar )
मुंबई: मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलं. त्यानंतर चर्चेचं प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा प्रत्येकजण आपआपल्या परिने अर्थ लावत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही या विधानाचे दोन अर्थ काढले आहेत. (pravin darekar first reaction on cm uddhav thackeray statement)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात भाजपने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मुंबईतही भाजपने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमानंतर प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत दोन थिअरी मांडल्या.
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढता येतील. एक म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं असावं. दबावाचे राजकारण केलं तर आमच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, असं त्यांना सांगायचं असेल. पण अशा विधानांनी राजकारण चालत नाही. दुसरं म्हणजे कदाचित चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कालच्या विधानाला मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर द्यायचं असेल. त्यामुळे त्यांनी हे विधान केलं असावं, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
सर्वच कामांचं ऑडिट करा
यावेळी बीकेसीतील कामांबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. बीकेसीच नव्हे तर मुंबईतील सर्वच कामांचं ऑडिट करण्याची गरज आहे. स्कायवॉक तुटलेले आहेत. नवीन पुलांना भेगा पडल्या आहेत. एखादे बांधकाम किंवा प्रकल्प तयार केल्यानंतर त्याला 25 वर्षे तरी काहीच होता कामा नये, अशा पद्धतीने ते काम झालं पाहिजे. मग ही कामे निकृष्ट दर्जाची आहेत का? असा सवाल करतानाच कंत्राटदार कोण होतं? किती पैसे खर्च केले? याचे मोजमाप करावे अशी मागणी आयुक्तांना करणार आहे, असं दरेकर यांनी सांगितलं.
काँग्रेसच बेरोजगार झालीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी काँग्रेसने बेरोजगार दिवस आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. आता काँग्रेसच बेरोजगार झालेला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं काम उरलेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यातून चांगलं काही येणारच नाही. मोदींच्या सात वर्षाच्या काळात जेवढा डायरेक्ट आणि इन डायरेक्ट जेवढा रोजगार उपलब्ध झाला. तेवढा आपल्या 50 वर्षाच्या कालावधीत केला गेला नाही, माझं काँग्रेसच्या आंदोलकांना आव्हान आहे त्यांनी काँग्रेसने किती रोजगार दिले ते सांगावच. काँग्रेसचा स्वतः बेरोजगार झालेला आहे. त्यामुळे तो आपलाच बेरोजगारीचा अजेंडा काँग्रेस पुढे नेत आहे, असा चिमटा त्यांनी काढला. (pravin darekar first reaction on cm uddhav thackeray statement)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 September 2021 https://t.co/QOyEpQzxHd #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 17, 2021
संबंधित बातम्या:
ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचंय त्यांनी खुशाल यावं; आता संजय राऊतांची विरोधकांना खुली ऑफर
“कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल”
नागपूर ZP पोटनिवडणूक : महाविकास आघाडी तुटल्यात जमा, शिवसेनेचे सर्व जागांवर उमेदवार
(pravin darekar first reaction on cm uddhav thackeray statement)