शरद पवारांवर विश्वास, मुख्यमंत्र्यांना ते समजावतील : प्रवीण दरेकर

मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती आहे.

शरद पवारांवर विश्वास, मुख्यमंत्र्यांना ते समजावतील : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 4:38 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत, पण तरीही त्यांच्यावर विश्वास आहे. जो काय निर्णय ते घेतील, तो व्यवहारी दृष्टिकोनातूनच घेतील आणि मुख्यमंत्र्यांना समजावून सांगतील असा विश्वास भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला. मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याच्या वृत्तावर प्रवीण दरेकरांनी भाष्य केलं. (Pravin Darekar on Sharad Pawar over Metro Car Shed)

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं. केंद्राचे आणि राज्याने एकत्र बसून वाद सोडवला तर जनतेची जागा त्यांच्याच वापरात येईल. मग खेचाखेची का? या बसा आणि चर्चा करा” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पर्यायाने भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं. कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती आहे.

“लोकवर्गणीचा मुद्दा पटत नाही म्हणणारे कोण?”

“शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यासारखीच भूमिका घेतली आहे. राम मंदिर उभारणीसाठी लोकवर्गणीचा मुद्दा पटत नाही म्हणणारे कोण आहेत? वर्गणी गोळा करत आहोत खंडणी नाही, लोकांना यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यामुळे ते घेत आहेत” असं उत्तर दरेकर यांनी दिलं.

“स्वयंसेवकांची नेमणूक होत नसते तर ते स्वतःहून ते पुढे येतात. चार लाख स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रचार करणार तर याचा काय त्रास होतोय. सर्वसामन्यांना जर यात सामील व्हायचं असेल तर मग काय हरकत आहे?” असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला. देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी राम मंदिर बांधले जात आहे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावण्यात आला होता. (Pravin Darekar on Sharad Pawar over Metro Car Shed)

“प्रशांत किशोरांनी पोटापाण्याची अडचण करु नये”

पश्चिम बंगालमध्ये भाजप दोन आकडी संख्याही गाठू शकणार नाही, असं भाकित निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलं आहे. “प्रशांत किशोर म्हणतात ते त्यांचा छंद आहे, की धंदा याचा आधी विचार करावा. उगाच टोकाचं वक्तव्य करुन स्वतःच्या पोटापाण्याची अडचण करु नये” असा सल्ला प्रवीण दरेकरांनी दिला.

“राम सातपुतेंच्या लग्न सोहळ्यातील गर्दीचं समर्थन नाहीच”

भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं समोर आलं होतं. “कालच्या कार्यक्रमात जे काही झालं, त्याचं कसलंही समर्थन नाही. काळजी घ्यायलाच हवी आणि आम्ही पण ती घेतोय. पण राज्यात अनेक ठिकाणी आता सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरं उघडली गेली आहेत आणि आता हे सगळं व्यवस्थित सुरु आहे. नियम पाळायलाच हवेत पण केवळ मी किंवा देवेंद्रजी तिथे होते याचा राजकीय मुद्दा करायला नको. समर्थन असण्याचं काहीच कारण नाही. झाला प्रकार चुकीचा होता, फक्त याचं राजकारण करु नका. अनेक कार्यक्रमात हेच होतं, तर मग आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका नको” असं मत प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

शरद पवार मध्यस्थीला तयार, पण पर्याय काय त्यांच्यासमोरचे?

(Pravin Darekar on Sharad Pawar over Metro Car Shed)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.