Pravin Darekar : काका मला वाचवा हिंदुत्वाची भूमिका घेऊ नका, म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार, दरेकरांचा सेनेला टोला
त्यांची सभा झाल्यावर देवेंद्र फडणवीस सुद्धा सभा घेऊन उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला. तर सेनेचा बेस हलतो म्हणून आता सांगावं लागतं. काका मला वाचवा हिंदुत्वाची आमची भूमिका घेऊ नका असे म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुंबई : राज्यात सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर (Ayodhya) आणि हिंदुत्वावरून (Hindutva) जोरदार वार पलटवार सुरू आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आता पुन्हा आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेला डिवचलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय तोफा सध्या चागल्याच धडाडत आहे. शिवसेनाला त्यांचं हिंदूत्व सांगावं लागतं, यातच सर्व काही आलं. बाळासाहेबांना सांगावं लागलं नव्हतं हिंदूत्व घेतोय. जनतेने त्यांना हिंदूहृदय सम्राट बनवलं. आता ही वेळ का आली खरं आणि खोटं हिंदूत्व दाखवण्याची, असा सवाल दरेकरांनी सेनेला केला आहे. तर सभा घेऊन उत्तर देणार आहेत चांगलं आहे. पण त्यांची सभा झाल्यावर देवेंद्र फडणवीस सुद्धा सभा घेऊन उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला. तर सेनेचा बेस हलतो म्हणून आता सांगावं लागतं. काका मला वाचवा हिंदुत्वाची आमची भूमिका घेऊ नका असे म्हणून आदित्य ठाकरे अयोध्येत जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते
तसेच नरेंद्र मोदींनी पाच वर्षे काम केलं पुन्हा लोकांनी निवडून दिले. हिटलर वाटले असते तर लोकांनी निवडून दिले नसते. त्यामुळे क्षमता नसताना राऊत यांनी बोलू नये, असा पलटवार दरेकरांनी केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील खासदार यांनी राज ठाकरे यांच्याबाबत घेतलेली भूमिका वयक्तिक आहे. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील, असेही ते म्हणाले, तर नवनीत राणा यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले. एक महिला खासदार आहे, त्यांचा छळ केला गेला. हे लोकांना माहित आहे. सरकारला कोर्टाने फटकारलं आहे. भाजप सूडबुद्धीने कारवाया करत नाही. पण हे सरकार यंत्रणेचा वापर करत आहे. तसेच राज्यातील परिस्थिती योग्य नाही. ह्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आशिष शेलार यांचीही सडकून टीका
तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनीही शिवसेनावर आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांच्या रक्तात हिटलरशाही ते कुणावरही टीका करतात. मोदींवर टीका करण्याची लायकी,ताकद आणी अक्कल त्यांच्यात नाही. पात्रता नसलेल्या छोट्या राऊतांनी मोदींवर बोलू नये, अशी सडकून टीका शेलारांनी केली आहे. तसेच लागलेले पोस्टर्स आणि मजकूर यावरून सेना सभेस लोक येतील यावर त्यांचाच विश्वास उरलेला नाही. 15 मेची भाजप सभा पूर्वनियोजित आहे. ती 14 जूनच्या सेनेच्या सभेला उत्तर देण्यासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.