Pravin Darekar: आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचाल तर भाजप स्वस्थ बसणार नाही; प्रवीण दरेकर यांचा इशारा

Pravin Darekar: भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने भाजपमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Pravin Darekar: आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचाल तर भाजप स्वस्थ बसणार नाही; प्रवीण दरेकर यांचा इशारा
आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचाल तर भाजप स्वस्थ बसणार नाही; प्रवीण दरेकर यांचा इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 2:20 PM

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने भाजपमध्ये संतापाचे वातावरण आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच कंबोज हल्ला आणि नवनीत राणाप्रकरणावरूनही त्यांनी आघाडी सरकारला इशारा दिला. आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजप स्वस्थ बसणार नाही. उद्या या अॅक्शनला रिअॅक्शन झालं. तर भाजपही (bjp) टीट फॉर टॅट करू शकते. पण आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. लोकशाही मानणारे आहोत. त्यामुळे लोकशाही मार्गाने जे काही करायचं ते करू, असं प्रवीण दरेकर म्हणाले. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना या प्रकरणी निवेदन देण्यात येणार आहे. याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करू. कालच आम्ही निवेदनही दिलं आहे. जमावाने कसा हल्ला केला त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असंही दरेकर यांनी सांगितलं.

राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. मोहित कंबोज हे सार्वजनिक रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मागे काँग्रेसचे कार्यकर्ते फडणवीसांच्या घरी आंदोलन करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना एक दोन किलोमीटर अंतरावर बॅरिकेड लावून रोखलं गेलं. पण राणांच्या घरापर्यंत जायला शिवसैनिकांना मुभा दिली. ज्या पक्षाचं सरकार आहे. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांदेखत गुंडगिरी सुरू आहे. सरकार पुरस्कृत कधीच एवढी गुंडगिरी, दहशत झाली नाही, असं दरेकर म्हणाले.

आम्ही हात बांधून बसलो नाही

शिवसेनेचे नेते या दहशतीचं समर्थन करत आहेत. आगीत तेल ओतत आहेत. अशा प्रकारचं समर्थन करणार असाल, आणखी आक्रमक होऊन हल्ला करण्याचं धमकावत असाल तर समोरचे कार्यकर्ते हात बांधून बसलेले नाहीत. मधमाश्यांच्या पोळावर दगड मारल्यावर कुठे कुठे माशा बसतात ते माहीत आहे. भाजपचे कार्यकर्ते संघर्षशील कार्यकर्ते आहेत. आमचा इतिहास संघर्षाचा आहे. थोडे कार्यकर्ते असतानाही भाजपने संघर्ष केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Mohit Kamboj Car attack : ‘कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि हत्यारं होती’ विनायक राऊतांचा सनसनाटी आरोप

Navneet Rana | शिवसेनेविरोधात दोन हात करणाऱ्या कोण आहेत नवनीत राणा? मॉडलिंग ते राजकारणातील नवनीत यांचा प्रवास

Dilip Walse Patil on Navneet Rana: राणा दाम्पत्यांना कुणाची तरी सुपारी, त्याशिवाय एवढं धाडस होऊच शकत नाही; गृहमंत्र्यांचा दावा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.