निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपनीवर कारवाई

ज्या कंपन्या निम्म्या कर्मचाऱ्यांना work from home करण्यास सांगत नाहीत, त्यांच्यावर कलम 188 अंतर्गत दंडाची कारवाई होऊ शकते. Work From Home Corona

निम्म्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' न दिल्यास कंपनीवर कारवाई
Follow us
| Updated on: Mar 18, 2020 | 4:08 PM

मुंबई : ज्या कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या नियमाची अंमलबजावणी करत नसतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला. ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास घरुन काम करण्याचं आवाहन केलं आहे. (Work From Home Corona)

पुढील दोन दिवसांत मुंबईतील खाजगी कंपन्यांमध्ये भेट देऊन तपासणी करणार. ज्या कंपन्या निम्म्या कर्मचाऱ्यांना work from home करण्यास सांगत नाहीत, त्यांच्यावर कलम 188 अंतर्गत दंडाची कारवाई होऊ शकते, असं प्रवीण परदेशी यांनी सांगितलं.

मुंबईला स्टेज 3 मध्ये न्यायचे नसेल, तर काळजी घेणं गरजेचे आहे. आपत्ती ही संधी मानली पाहिजे. थुंकणाऱ्यांवर कायमस्वरुपी अधिक दंड आकारला जाणार आहे. यामुळे टीबीलाही आळा बसेल, असं परदेशी म्हणाले.

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयावर भार पडत आहे. खासगी रुग्णालय आणि लॅबनी आपल्याला मदत करण्याचं मान्य केलं आहे. याचा आढावा आज संध्याकाळी घेऊ, असंही आयुक्तांनी सांगितलं.

मुंबई महापालिका मुख्यालय आणि वॉर्ड ऑफिसमध्ये नागरिकांच्या तक्रारी ईमेल, टेलिफोन नंबर (1916) वर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व वॉर्डना व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा दिली आहे, अशी माहितीही प्रवीण परदेशी यांनी दिली.

मध्य पूर्व देशांमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी येणार आहेत. त्यांना कॉरन्टाइन करण्याचं मोठं काम असेल. सर्व खासगी संस्थानी निःशुल्क जागा देण्याची तयार दर्शवली आहे. अनेक हॉटल रुम देण्याची सर्व व्यवस्था करत आहेत. हॉटेलमध्ये फक्त जे प्रवासी बाहेरुन आलेले आहेत, त्यांना कॉरन्टाइन करत आहोत, तिथे कोरोना रुग्णांना ठेवत नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, असं परदेशी यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा 42 वर गेला आहे. मुंबईत 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

Work From Home Corona

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.