तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशाच उभ्या राहतील: किशोरी पेडणेकर

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका सज्ज आहे. अतिरिक्त जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. मुलांसाठी वेगवेगळे सुसज्ज सेंटर उभारण्यात आले आहेत. (Prepared to face possible third wave of COVID-19, says kishori pednekar)

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशाच उभ्या राहतील: किशोरी पेडणेकर
mayor kishori pednekar
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 1:19 PM

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका सज्ज आहे. अतिरिक्त जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. मुलांसाठी वेगवेगळे सुसज्ज सेंटर उभारण्यात आले आहेत. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशीच उभी ठेवण्यात येईल, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. (Prepared to face possible third wave of COVID-19, says kishori pednekar)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. लसींच्या तुटवड्या अभावी लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत. हे खरं आहे. सध्या पहिल्या डोस घेतलेल्यांची संख्या 49 हजारावर गेली आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 13 लाखावर गेली आहे. कालच आपल्याला 1 लाख 35 हजार लसींचा साठा मिळाला आहे. उद्याही काही लसींचा साठा उपलब्ध होणार आहे. असाच लस पुरवठा सतत होत राहिला तर लसीकरणाच्या मोहिमेला गती येईल. रुग्ण संख्या रोखण्यात यश येत आहे, असं सांगतानाच तरीही थोडी काळजी घ्या. तिसऱ्या लाटेचं संकट आहे. पण काळजी घेतल्यास आपण या लाटेला रोखू शकतो, असं पेडणेकर म्हणाल्या.

तरच लवकर लसीकरण होईल

खासगी दवाखान्यात लस मिळत आहे. आपल्याकडे लस मिळत नाही. त्याचं कारण केंद्राने खासगी दवाखान्यांना 25 टक्के लस दिली आहे. पण राज्य आणि पालिकेला जास्तीत जास्त लस मिळाली आहे. तरच लवकर लसीकरण होईल. जिथे प्रादुर्भाव जास्त आहे. तिथे जास्त लस द्यायला हवी, असं त्यांनी सांगितलं.

व्यापाऱ्यांमागे वेगळे चेहरे

लॉकडाऊनमुळे नुकसान होत असल्याने व्यापारी आंदोलन करत आहेत. त्यावरही महापौरांनी भाष्य केलं. व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. सगळ्यांचंच नुकसान होत आहे. परंतु, अजूनही काही वॉर्डात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. दोन तीन दिवसात यावर काही तरी निर्णय होऊ शकतो, असे संकेत देतानाच काही राजकीय पक्षांकडून व्यापाऱ्यांना उकसवलं जात आहे. व्यापारी संघटनांच्या मागे वेगळे चेहरे आहेत. दबाव तंत्रात लोकांच्या जीवाची पर्वा केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. ते चांगला मार्ग काढतील, अशी आशा आहे, असंही त्या म्हणाल्या.

रस्त्यांची कामे पूर्ण करणार

पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी रस्त्यांच्या कामावरून महापालिका प्रशासनावर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 1200 कोटींच्या रस्त्यांची कामे राहिली आहेत. मुंबईत अजून बरीच कामे सुरू आहेत. पण कोव्हिड काळात मनुष्यबळ कमी असल्याने काम रखडलं. पण हे काम पूर्ण करण्याचा लवकरच मानस आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पाणी जपून वापरा

पाऊस पडत नसल्याने मुंबईत पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईत सध्या लागेल इतका पाणीसाठा आहे. पाणी कपात करायची की नाही याचा परिस्थिीतीनुसार निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच मुंबईकरांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहनही त्यांनी केलं. (Prepared to face possible third wave of COVID-19, says kishori pednekar)

संबंधित बातम्या:

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, मागासांना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ द्या; रामदास आठवलेंची मोठी मागणी

राजीनामा सत्र सुरूच; 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मस्के मुंबईकडे रवाना; पंकजा मुंडेंसोबत मंगळवारी बैठक

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोल्हापूर शहरातल्या लसीकरण केंद्रांवर गर्दीच गर्दी

(Prepared to face possible third wave of COVID-19, says kishori pednekar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.