President Election : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्लीवरून फोन, राष्ट्रपती निवडणुकीबाबत राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा काय?

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. राजनाथ सिंह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर देशातील विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी ही भाजपकडून देण्यात आली आहे. 

President Election : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्लीवरून फोन, राष्ट्रपती निवडणुकीबाबत राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्लीवरून फोनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 8:16 PM

मुंबई : संपूर्ण देशातलं वातावरण सध्या निवडणूकमय झालंय. कारण काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या निवडणुका (Rajya Sabha Elections) पार पडल्या आहेत. त्यानंतर आता विधान परिषदेच्याही निवडणुकांची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचीही (President Eelction) घोषणा झाली आहे. त्याबाबत वेगाने हलचाली सुरू आहेत. विरोधकांकडून एक उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप नेतेही विविध राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधत आहेत. याच निवडणुकीबाबत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. राजनाथ सिंह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर देशातील विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी ही भाजपकडून देण्यात आली आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न

या निवडणुकीसाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ सहज उपलब्ध आहे. त्यामुळे एनडीए जो ठरवेल तोच उमेदवार सहज निवडून येईल असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांशीही काही दिवसांपूर्वीच राजनाथ सिंह यांनी संवाद साधला आहे.

शरद पवार यांचा निवडणूक लढवण्यास नकार

विरोधकांकडून जेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नवांची चाचपणी झाली तेव्हा सर्वात आधी नाव समोर आलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं, त्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठकही पार पडली. या बैठकीला अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र पवारांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे सहाजिकच विरोधकांना दुसऱ्या चेहऱ्याचा विचार करावा लागला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पवारांच्या नकार देण्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पवार साहेंबाचा तो व्यक्तीगत प्रश्न आहे. तसेच nda कडे राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठीची मतं आहेत. तेही पवार साहेबांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी नकार दिला असेल, त्यांच्या निर्णयाचा आपण आदर करायला हवा, अशी सावध प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे. विरोधकांकडून आता ही निवडणूक लढवण्यासाठी फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा तसेच इतर काही नावांचाही विचार केला जाता आहे. भाजप या निवडणुकीत कुणाला उमेदवारी देणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र हेही चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होणारच आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.