राष्ट्रपती यांनी राज्यपाल कोश्यारी यांना…., आदित्य ठाकरे यांची नेमकी मागणी काय?
उत्तराखंडमध्ये व्यवसाय नेण्यासाठी राज्यपाल प्रयत्न करत असल्याचं वाचलं होतं.
मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटतं राज्यपाल कोश्यारी यांचं हे पहिलं वक्तव्य नाही. त्यांनी अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत. हे सर्व जाणूनबुजून होते की, काय. यामागं वेगळं काही असू शकत. पण, राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. राष्ट्रपती महोदयांनी राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त केलं पाहिजे. राष्ट्रपती हे सुद्धा राज्यपालांना माफी मागण्यास सांगू शकतात. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी असं वादग्रस्त व्यक्तव्य करावं, हे अपेक्षित नव्हतं. अनेक वर्षांपासून बरेच राज्यपाल पाहिले. त्यांची भेट घेतली. पण, असे राजकीय राज्यपाल कधी आयुष्यात बघीतले नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केला.
कोण योग्य होता नव्हता, या जुन्या गोष्टी आहेत. त्यात आता काय ठेवलं आहे. सर्व राजकीय पक्ष जुन्या गोष्टीवरून वाद करतात. कोणताही राजकीय पक्ष हा भवितव्याविषयी बोलत नाही. आता काय सुरू आहे. भविष्यात काय होणार, यावर चर्चा झाली पाहिजे, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
उत्तराखंडमध्ये व्यवसाय नेण्यासाठी राज्यपाल प्रयत्न करत असल्याचं वाचलं होतं. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. महाराष्ट्राला अडविण्याचं काम सुरू आहे. भाजपच्या मनात महाराष्ट्राबद्दल काय आहे, ते महाराष्ट्रासमोर येत आहे. सरकार ही महाराष्ट्र विरोधी सरकार आहे. शेवटच्या अधिवेशनात आमदारांचा अपमान करून राज्यपाल निघून गेले. तरीही कुठली कारवाई झाली नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
दहा वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्ती हा नारा दिला होता, याची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली. तसेच राज्य सरकार असंविधानिक आहे. याला आम्ही न्यायालयात आव्हान दिलं आहे, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.