Special Report : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन मुंबई; मोदी यांच्या निशाण्यावर कोण?
पैसा भ्रष्टाचारामध्ये जात असेल. बँकेच्या तिजोरीत राहत असेल. तर मुंबईचा भविष्य उज्ज्वल कसा होईल, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
मुंबई : नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटन आणि विविध विकासकामांचे भू्मिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपनं मिशन मुंबई महापालिकेला सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मनपाचे रणशिंगच फुंकलं. मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर निशाणा साधलाय. पंतप्रधानांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन झालं. भाजपची नजर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आहे. मुंबई मनपावर निशाणा साधत भाजपला मदत करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलंय. मुंबई महापालिकेचा पैसा बँकेत एफडीच्या स्वरुपात पडून राहत असेल, तर मुंबईचा विकास कसा होणार असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मुंबईच्या विकासात मनपाची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबईच्या विकासासाठी बजेटची काही कमी नाही. मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. पैसा भ्रष्टाचारामध्ये जात असेल. बँकेच्या तिजोरीत राहत असेल. तर मुंबईचा भविष्य उज्ज्वल कसा होईल, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
तर जलद गतीने विकास होणार
मुंबई महापालिकेत पैसा आल्यास आणखी जलद गतीने विकास होणार, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचं आहे. डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे.
मुंबई मेट्रोचा विस्तार होत आहे. २०१४ पर्यंत फक्त १०-१२ किलोमीटर चालत होती. आता मेट्रोचा विकास झाला आहे. यापुढं लोकल, मेट्रोमुळं मुंबईचा विकास करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने कनेक्टिव्हीटी वाढत आहे. यामुळं मुंबईचा विकास होत आहे. येथे राहणे सर्वांसाठी सुविधाजनक होईल.
मेट्रोने केला प्रवास
नवीन वर्षात अनेक विकासकामांचं गिफ्ट मुंबईला मिळालं. मेट्रोनं पंतप्रधानांनी प्रवास केली. भांडूप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, ओशिवरा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालयांचं उद्धाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं.
२६ हजार कोटींचे मलनिस्सारण प्लाँट, ४०० किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. एक लाख फेरीवाल्यांना स्वनिधी योजनेअंतर्गत १० हजार रुपये कर्ज योजना सुरू झाली आहे. मुंबईत फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे.