म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास खासगी रुग्णालयांचा नकार
या घातक बुरशीजन्य रोगावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन्स लागतात. | mucormycosis

मुंबई: राज्य सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सोय केल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यामुळे म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) लागण झालेल्या सामान्य लोकांना उपचारासाठी पैसे आणायचे तरी कुठून असा प्रश्न पडला आहे. (Private hospitals in Mumbai denied to give free treatment for mucormycosis under mahatma phule jan arogya yojana scheme)
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या घातक बुरशीजन्य रोगावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन्स लागतात. याच सगळ्याचा खर्च 20 ते 30 लाखांच्या घरातही जाऊ शकतो. मात्र, आता मुंबई आणि पुण्यातील काही खासगी रुग्णालयांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यास नकार दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार या रुग्णालयांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी Steroidsचा मारा, ‘म्युकरमायकोसिस’चा धोका वाढला
याशिवाय, सध्या राज्यात म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाटी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सचाही तुटवडा जाणवत आहे. सरकार त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, ही इंजेक्शन्स 31 मे नंतरच उपलब्ध होऊ शकतील. परिणामी पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले होते.
‘सर्व रेशनकार्ड धारकांना लाभ मिळेल’
म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून आपल्या शरीरात जातो – डॉ. तात्याराव लहाने
लक्ष्मणरेषा ओलांडू नये, अन्यथा काय होतं ते कोरोनाने दाखवलं : उद्धव ठाकरे
Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?
(Private hospitals in Mumbai denied to give free treatment for mucormycosis under mahatma phule jan arogya yojana scheme)