PS : ज्यांच्याविना मंत्र्यांचे पान पण हालत नाही, त्यांनी अशी खेचून आणली आमदारकी, मिलिंद नार्वेकरच नाहीत तर हे पण या शर्यतीत

PS to MLC, MP : जवळपास 20 वर्षे उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव राहिलेले मिलिंद नार्वेकर आता विधान परिषदेत आमदारकी गाजवतील. अर्थात असे काही पहिल्यांदा घडले नाही की खासगी सचिव एखाद्या सदनाचा सदस्य झाला. यापूर्वी पण यांनी हा चमत्कार घडवला आहे.

PS : ज्यांच्याविना मंत्र्यांचे पान पण हालत नाही, त्यांनी अशी खेचून आणली आमदारकी, मिलिंद नार्वेकरच नाहीत तर हे पण या शर्यतीत
मिलिंद नार्वेकर, दिलीप वळसे पाटील, संजय झा
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 3:19 PM

महाराष्ट्रात काल विधान परिषदेचे कवित्व संपले. कुणी सत्ते पे सत्ता टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीचा एक शिलेदार हरला. वो सात कोण? हे लवकरच उघड होईल ही. काँग्रेस म्हणते त्याप्रमाणे या ट्रॅपमध्ये त्यांचे घरभेदी उघड होतील. पण याच दरम्यान एक विशेष गोष्ट घडली आहे. उद्धव ठाकरे यांचे गेल्या 20 वर्षांपासून खासगी सचिव असलेले मिलिंद नार्वेकर विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यांनी आमदारकी खेचून आणली. त्यांच्या पारड्यात मतं पडली. ज्या सदनात त्यांचे बॉस, उद्धव ठाकरे बसत होते, त्याच सदनाचे ते सदस्य असतील. पण हा चमत्कार काही पहिल्यांदा घडला नाही. खासगी सचिवांनी यापूर्वी पण आमदारकी, सदस्यत्व खेचून आणले आहे.

अनेक राज्यात हा चमत्कार

खासगी सचिवाचा एखाद्या सदनाच्या सदस्य होण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नसला तरी अनेकदा घडला आहे. बिहारपासून ते महाराष्ट्रापर्यंत त्याचे अनेक उदाहरणं आहेत. अर्थात ते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. काही खासगी सचिवांच्या गळ्यात या खटाटोपाने मंत्रि‍पदाची माळ पण पडली आहे. आता मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

या नेत्यांनी केला खासगी सचिव ते सदस्य होण्यापर्यंतचा प्रवास

1. मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे जेव्हा राजकारणात आले, तेव्हा त्यांना एका सहकाऱ्याची गरज होती. त्यावेळी नार्वेकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना मदतनीस म्हणून सोबत घेतले. तेव्हापासून ते एखाद्या सावली सारखे त्यांच्यासोबत होते. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानल्या जातात.

शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडले, तेव्हा त्यांनी नार्वेकर शिवसेना चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. तेव्हा पण हाच आरोप झाला. प्रत्येकवेळी उद्धव ठाकरे यांना त्यांच्यावरील आरोप नाकारले. शालांत परीक्षा उत्तीर्ण नार्वेकर आणि त्यांच्य पत्नीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती आहे.

2. दिलीप वळसे पाटील – दिलीप वळसे पाटील कधीकाळी शरद पवार यांचे खासगी सचिव होते. त्यांना थोरल्या पवारांनी राजकारणात आणले. त्यांना पक्षाचे तिकीट, चिन्हावर निवडून आणले. 1990 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर अंबागाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरुच आहे. ते सात वेळा आमदार झाले. ते विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. ते 2009 ते 2014 या कालावधीत विधानसभेचे अध्यक्ष होते. पवारांचे बोट धरुन राजकारणात आलेले वळसे पाटील आता अजितदादांच्या एनसीपीमध्ये आहेत.

3. संजय यादव – बिहारमधून नुकतेच राज्यसभेवर गेलेले संजय यादव यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात तेजस्वी यादव यांचे खासगी सचिव म्हणूनच झाली होती. राष्ट्रीय जनता दलात त्यांचे पद राजकीय सल्लागार असेच आहे. तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा 2015 मध्ये ते चर्चेत आले होते.

2021 मध्ये लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यांनी त्यांच्यावर पक्ष संपविण्याचा आरोप पण लावला होता. लालप्रसाद यांनी हस्तपेक्ष केल्यानंतर या मुद्यावर पडदा पडला. संजय यादव हे मूळचे हरियाणाचे रहिवाशी आहेत. क्रिकेट सरावा दरम्यान त्यांची तेजस्वी यादवसोबत भेट झाली होती.

4. संजय कुमार झा – जनता दल (संयुक्त) राज्यसभा सदस्य संजय कुमार झा यांची कहाणी पण अशीच आहे. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांचे सहकारी आणि सल्लागार अशी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. संजय झा यांना जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. ते बिहार सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. 2006 मध्ये पहिल्यांदा ते विधान परिषदेचे सदस्य झाले. 2012 मध्ये नितीश कुमार यांच्यासोबत त्यांनी राजकीय धडे गिरवायला सुरुवात केली.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.