प्रियांका चोप्रा आणि निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत?
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थातच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या जोडीचे भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत. पण या दोघांच्या चाहत्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा नाही. अमेरिकेतील एका प्रसिद्ध वेबसाईटने याबाबतचे […]
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थातच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या जोडीचे भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत. पण या दोघांच्या चाहत्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा नाही. अमेरिकेतील एका प्रसिद्ध वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रियांका आणि निक यांच्यात वाद सुरु आहे. त्यांच्यात सतत छोट्या-छोट्या गोष्टींमुळे भांडण होतात. प्रियांकाला लग्नाआधी निक खूप कुल वाटायचा, मात्र आता तो तिला सतत कंट्रोल करणारा वाटू लागला आहे. तर निकच्या मते, प्रियांका खूप लवकर चिडते, तिला खूप राग येतो. विशेष म्हणजे या दोघांनी खूप घाईघाईत लग्न केले आहे. त्या दोघांच्या स्वभावात विभिन्नता आहे. प्रियांका ही खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे निकनं प्रियांकाशी घटस्फोट घ्यावा असं जोनस कुटुंबियांना वाटतं. पण याबाबत अधिकृतरित्या कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. तसेच यावर निक किंवा प्रियांकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निक फ्लोरिडाजवळील मियामी या ठिकाणी सुट्टी गेले होते. त्याबाबतचे फोटो आणि व्हीडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोवरून तरी या दोघांमध्ये चांगलेच बॉण्डींग निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
जून 2018 पासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रियांका आणि निकने डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहा महिने रिलेशनमध्ये राहिल्यानंतर 1 आणि 2 डिसेंबर 2018 रोजी राजस्थानमधील जोधपूरजवळी उम्मैद भवन पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नानंतर 4 वेडींग रिसेप्शनचेही आयोजन केले होते.