आव्हाड का म्हणतायत, ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा!

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

आव्हाड का म्हणतायत, ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा!
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 8:44 PM

ठाणे : केंद्र सरकारवर आपला जोरदार हल्ला झाला पाहिजे, त्याचबरोबर राज्यात आपली सत्ता असली तरी राज्य सरकारचे काही निर्णय चुकत असतील तरीसुद्धा आपण आंदोलन केले पाहिजे, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळाव्यादरम्यान मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला, यावेळी आव्हाड बोलत होते. (Protest against Thackeray government too : Jitendra Awhad)

मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, या मेळाव्यानंतर ठाण्यात मोठ्या संख्येने राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून बेरोजगार युवकांना कशा प्रकारे रोजगार मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी शेख यांनी देशभरातील बेरोजगारीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. तर दुसरीकडे आपल्याला आक्रमक होऊन काम करावं लागणार आहे. केंद्र सरकारवर आपला जोरदार हल्ला झाला पाहिजे. त्याचबरोबर राज्यात आपली सत्ता असली तरी राज्य सरकारचे काही निर्णय चुकत असतील तरीसुद्धा आपण आंदोलन केले पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांना संबोधले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने पाठवलेल्या नोटीशीबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. इतकी वर्ष चौकशी लागली नाही आणि आता अचानक कशी काय लागली? याचा अर्थ सहाजिक आहे की, यामागे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश हे एकच कारण आहे.

हेही वाचा

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता 

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

(Protest against Thackeray government too : Jitendra Awhad)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.