Mahavikas Aghadi : खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय… घोषणाबाजी करत विरोधकांचं सरकारविरोधात आंदोलन
राज्यात पूरपरिस्थिती आहे. ओला दुष्काळ (Flood) जाहीर करावा, अशा विविध मागण्या राज्य सरकारकडे करत आंदोलन केले. राज्य सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय... अशा घोषणांनी विधीमंडळाचा (Assembly) परिसर दणाणून गेला होता.
मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अर्थात विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. राज्य सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सरकार येवून 45 दिवस झाले. कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत, कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. राज्यात पूरपरिस्थिती आहे. ओला दुष्काळ (Flood) जाहीर करावा, अशा विविध मागण्या राज्य सरकारकडे करत आंदोलन केले. राज्य सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, आले रे आले, गद्दार आले, 50 खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणांनी विधीमंडळाचा (Assembly) परिसर दणाणून गेला होता. खाते वाटपावरूनही भांडणे सुरू आहेत. यावरूनही महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
‘खातेवाटपावरून गोंधळ सुरू’
वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती म्हणजे विकासावरून मुद्दा हिंदुत्वाकडे भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्यात पूरपरिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारमधील आमदार मात्र खाते वाटपावरून नाराज आहेत. राज्यातील समस्या त्यांना दिसत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही, असा संताप शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांचे आंदोलन
अजित पवारांनी केला हल्लाबोल
विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच शपथ घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे, असे काल अजित पवार यांनी म्हटले होते. तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, विरोधकांची अवस्था केविलवाणी झाल्याचे गिरीष महाजन म्हणाले आहेत. अनेकांची चौकशी होत आहे. त्यामुळे ईडील दोष देऊन काही उपयोग नाही, असा टोला त्यांनी लगावला.