राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका, अडचणी वाढणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आलीय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका, अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 7:23 PM

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून राज्यपालांना आपल्या पदावरुन पायउतार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आलीय.

मुंबई हायकोर्टात दीपक जगदेव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात याचिका दाखल केलीय. राज्यपाल वादग्रस्त विधान करुन समाजातील शांतता, एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय.

संबंधित याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर येत्या 24 नोव्हेंबरला पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तर भारतातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी ते जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पण या दौऱ्यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते राज्यपालांना भेटून महाराष्ट्रातील वादावर चर्चा करतात का? असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यपालांच्या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर आता ते स्वत: त्यांच्या विधानावर काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.