“आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय”, राष्ट्रवादीचा आरोप

| Updated on: Feb 17, 2023 | 12:25 AM

नाराजीच्या चर्चांना खोटं ठरवत गिरीश बापट अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. काल फडणवीसांनी रुग्णालयात बापटांची भेट घेतली.

आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय, राष्ट्रवादीचा आरोप
Follow us on

मुंबई : नाराजीच्या चर्चांनंतर गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडर लावून कसब्याच्या प्रचाराला पोहोचले आहेत. मात्र आजारी बापटांना प्रचाराला आणून भाजप त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय.

नाराजीच्या चर्चांना खोटं ठरवत गिरीश बापट अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. काल फडणवीसांनी रुग्णालयात बापटांची भेट घेतली. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर लावत बापट कसबा मतदारसंघात आले. मात्र आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय.

भाजपच्या हेमंत रासनेंच्या प्रचारासबरोबर मविआचे रवींद्र धंगेकर यांनीही प्रचाराला सुरुवात केलीय. पुण्यात जवळपास सर्वच पक्षांमध्ये मतभेद आणि नाराजीचे सूर होते., त्यांना मागे टाकत प्रचाराला सुरुवात झाल्याचा दावा करण्यात येतोय.

कसब्यात आधी उमेदवारीवरुन स्थानिक काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद तयार झाले. नंतर ब्राह्मण उमेदवार डावलला म्हणून हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनी भाजपविरोधात अर्ज भरला. चिंचवडमध्ये राहुल कलाटे मविआच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला सुरुवातीच्या काळात चिंचवडची जागा मविआनं सोडावी, म्हणून ठाकरे गटाचा आग्रह होता.

आता चिंचवडमध्ये मविआ एकत्र आहे, मात्र ठाकरे गटासोबत युती केलेल्या वंचित आघाडीनं अपक्ष राहुल कलाटेंना पाठिंबा दिलाय. तर इकडे कसब्यात मनसेनं प्रत्यक्ष प्रचारात सहभाग न घेता भाजपला पाठिंबा दिलाय. भाजपचे संजय काकडे सुद्धा आधी नाराज झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र माध्यमांसमोर येऊन त्यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळत कसब्यात भाजप विजयी होण्याचा दावा केलाय.

आधी तिकीटावरुन रस्सीखेच, त्यानंतर नाराजी आणि नंतर मनधरणी., या तिन्ही गोष्टी दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना कराव्या लागल्या आहेत., मात्र पुणेकर कुणाला कौल हे पाहणं महत्वाचं आहे.