Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट, रविंद्र धंगेकर जिंकले पण चर्चेत नाना पटोले कारण…

रवींद्र धंगेकर जिंकले आणि धंगेकरांची चर्चा सुरु झाली पण धंगेकरांची चर्चा जेवढी सुरु आहे. तितकेच चर्चेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा आहेत

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट, रविंद्र धंगेकर जिंकले पण चर्चेत नाना पटोले कारण...
नाना पटोले Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:28 AM

मुंबई : कसब्यात रवींद्र धंगेकर जिंकले आणि धंगेकरांची चर्चा सुरु झाली पण धंगेकरांची चर्चा जेवढी सुरु आहे. तितकेच चर्चेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा आहेत. आतापर्यंतच्या 5 महत्वाच्या निवडणुकीत पटोलेंनी सर्व ठिकाणी काँग्रेसला यश मिळवून दिलंय.पाहुयात

आणखी एका पोटनिवडणुकीत नानाभाऊंनी आपलं नेतृत्वं सिद्ध केलंय. प्रतिष्ठेच्या कसब्याच्या निवडणुकीतही काँग्रेसनंच बाजी मारली आणि धंगेकरांच्या रुपानं काँग्रेसचा आणखी एक आमदार वाढला. खरं तर कसब्यातली लढाई जिंकण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनं उतरली होती. फडणवीस तळ ठोकून होते, रोड शो झाले. मुख्यमंत्रीही उतरले पण महाविकास आघाडीच्या साथीनं, नाना पटोलेंनी 28 वर्षांच्या बालेकिल्ल्यात पंजाची मोहोर उमटवली.

नाना पटोलेंच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची कमान हाती येऊन, जेमतेम 2 वर्ष झालीत. याच 2 वर्षात पटोलेंनी काँग्रेसला महाराष्ट्रात उभारी देण्याचं कसं काम केलं, हे आकड्यातून स्पष्ट होतंय. नोव्हेंबर 2021 मध्ये नांदेडच्या देगलूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झालेत. भाजपचे सुभाष साबणे पराभूत झाले एप्रिल 2022 मध्ये कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत जयश्री जाधवांचा विजय झाला.

इथंही भाजपच्या सत्यजित कदमांचा पराभव झाला नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेस दोन्ही जागा जिंकल्या. फडणवीसांच्या होम ग्राऊंड नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या सुधाकर आडबालेंनी भाजपच्या ना.गो.गाणारांचा पराभव केला. अमरावतीच्या पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे धीरज लिंगाडे जिंकले तर फडणवीसांचे खास अशी ओळख असलेले रणजीत पाटील पराभूत झाले आणि आता कसब्यातही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर जिंकले आणि भाजपचे हेमंत रासने पराभूत झाले.

आमदारकीच्या 5 निवडणुकीत काँग्रेसची लढत थेट भाजपशीच झाली. ज्यात पटोलेंच्या नेतृत्वात पाचही निवडणुकीत काँग्रेसनं विजयचा गुलाल उधळला. पटोलेंना अध्यक्ष होऊन जेमतेम 2 वर्षेच झाली असली, तरी त्यांनी जशी छाप सोडली तसे काही वादही ओढवून घेतलेत.

नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन पटोले आणि थोरातांचा वाद टोकाला पोहोचला. प्रकरण थोरातांच्या विधीमंडळ नेतेपदाच्या राजीनाम्यापर्यंत आणि नंतर दिल्लीपर्यंत पोहोचलं. राज्यातला काँग्रेसचा एक गट पटोलेंच्या विरोधात होता…एवढंच नाही तर त्यांना हटवण्याचीही मागणी झाली पण दिल्लीचं नेतृत्वं पटोलेंच्या पाठीशी राहिलं.

अधूनमधून स्वबळावर लढण्याची भाषा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही नानांचे खटके उडतच असतात…पण पटोले आजवर आपल्या भूमिकेवर ठामच राहिले. देशभरात काँग्रेसची स्थिती चिंताजनक आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देशात काँग्रेसचा सफाया होतोय..पण महाराष्ट्रात पटोलेंनी पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला जिवंत करण्याचं काम केलंय. मात्र पोटनिवडणुकांमध्ये नाना पास झाले असले…तरी मोठी लढाई 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत असेल.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.