Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIDC Recruitment : आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटीनंतर एमआयडीसी भरतीवर प्रश्नचिन्ह, पुणे पोलिसांकडे विद्यार्थी दाद मागणार

एमपीएससी समन्वय समितीनं आता एमआयडीसी भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विद्यार्थी लवकरच या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत.

MIDC Recruitment : आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटीनंतर एमआयडीसी भरतीवर प्रश्नचिन्ह, पुणे पोलिसांकडे विद्यार्थी दाद मागणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 7:26 AM

पुणे : पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाच्या भरतीमधील पेपर फुटीची चौकशी सुरु केली. या चौकशी दरम्यान पुणे पोलिसांना म्हाडाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटणार असल्याची लिंक लागली. त्यानुसार कारवाई करत पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक केली. म्हाडा परीक्षा पेपर फोडण्याचा प्रयत्न करत असताना टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची लिंक पुणे पोलिसांना सापडली. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह दोघांना अटक करण्यात आलीय. आरोग्य भरती पेपर फुटीप्रकरणी कारवाई व्हावी, म्हणून पोलिसांकडे पाठपुरावा करणाऱ्या एमपीएससी समन्वय समितीनं आता एमआयडीसी भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विद्यार्थी लवकरच या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत.

दोन परीक्षेतील गुणांमधील तफावत,

आरोग्य विभाग, म्हाडा, शिक्षक पात्रता भरती परीक्षेनंतर आता एमआयडीसीच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एमआयडीसीच्या भरती परीक्षेच्या निकालावर एमपीएससी समन्वय समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अ‌ॅपटेककडून घेण्यात आलेल्या एमआयडीसीच्या परीक्षेत ज्या परीक्षार्थींना 99-196 गुण आहेत त्याच परीक्षार्थींना याआधी घेण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत मात्र 14 ते 33 गुण मिळाले आहेत.

मुंबई महापालिकेची परीक्षा टीसीएसकडून

मुंबई महापालिकेची परीक्षा टीसीएसने घेतली होती. तर, एमआयडीसीची परीक्षा अ‌ॅपटेकनं घेतली होती. दोन्ही परीक्षांच्या गुणांमधील हा मोठा फरक पाहता यात गैरप्रकार झाल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यानुसार आता लवकरच याविरोधात समितीकडून पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ही परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

भूमी अभिलेख परीक्षेच्या प्रक्रियेतून जीएस टेक्नॉलॉजी कंपनीला वगळण्याचा प्रस्ताव

आरोग्य भरती आणि म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यावर या प्रक्रियेतून संबंधित कंपनीला वगळण्याचा भूमी अभिलेख विभागाने पाठवला शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. 23 जानेवारीला प्रस्तावित असलेल्या राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील एक हजारहून अधिक पदांच्या भरती प्रक्रियेत जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा सहभाग आहे. आरोग्य भरती, म्हाडा पेपरफुटी प्रकरणात जीए टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख पोलिसांच्या अटकेत आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागच करत आहे, तर जीए टेक्नॉलॉजी कंपनीकडे तांत्रिक जबाबदारी आहे. भूमि अभिलेख विभागाकडून विविध संवर्गातील पदांच्या भरतीची जाहिरात 1 डिसेंबरला जाहीर करण्यात आलंय.

इतर बातम्या:

Aurangabad: नवीन वर्षात मालमत्ता कराचे बिल ऑनलाइन मिळणार, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय

Patan : शंभुराज देसाई जिल्हा बँकेच्या पराभवाचा वचपा काढणार? नगरपंचायतीच्या रणधुमाळीत घड्याळ गायब, पाटणकर गटाचं NCP पुरस्कृत पॅनेल मैदानात

Pune MPSC Aspirants students now claim malpractice in MIDC Recruitment file complaint to Pune Cyber Police

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.