एक्स्प्रेस हायवेवर पुणेकरांना जास्त दंड भरावा लागतोय की मुंबईकरांना ?, पाहा कोण आहे दंड भरण्यात आघाडीवर?

मुंबई-पुणे नवीन आणि जुन्या अशा दोन्ही महामार्गावर वाढते अपघात पाहून बेशिस्त वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच त्यांना शिस्त लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने व्यापक मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत 1 ते 7 डिसेंबरपर्यंत प्रबाेधन करण्यात आले. तर 8 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक विभाग सहा महिने ही मोहीम राबविणार आहे. 

एक्स्प्रेस हायवेवर पुणेकरांना जास्त दंड भरावा लागतोय की मुंबईकरांना ?, पाहा कोण आहे दंड भरण्यात आघाडीवर?
rtoImage Credit source: rto
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 10:40 AM

मुंबई :  मुंबई-पुणे नवीन आणि जुन्या अशा ( Mumbai-pune ) दोन्ही महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे परीवहन विभागाने (Transport department ) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-pune e-way) आणि जुना हायवे दोन्ही ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच त्यांना शिस्त लावण्यासाठी 1 ते 7 डिसेंबरपर्यंत प्रबाेधन केले. तर  आता 8 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. सहा महिने ही मोहीम चालणार आहे. या कारवाईत पुणेकरांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लेनची शिस्त न पाळता सर्वाधिक लेन कटींग केल्याची आकडेवारी बाहेर आली आहे. तर सिट बेल्ट न घातल्याप्रकरणी पिंपरीकरांवर सर्वाधिक 262 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लेन कटींग प्रकरणात सर्वात जास्त 34 टक्के तर सिट बेल्ट प्रकरणात 28 टक्के, ओव्हरस्पीडींगचे 21 टक्के, राँग पार्कींगचे 17 टक्के गुन्हे दाखल झाले आहे. तर  मुंबई-पुणे जुना हायवे ( एनएच – 48) वर या मोहीमेत सिट बेल्ट न घातल्या प्रकरणी एकूण 45 टक्के तर ओव्हरस्पीडींगचे 26 टक्के, लेन कटींगचे 16 टक्के गुन्हे दाखल झाले आहेत. सिट बेल्ट परिधान न करणाऱ्यांकडून 500 रूपये, लेन कटींग प्रकरणात 1000 रू. ,ओव्हरस्पीडींगबाबत कारला 2000 तर दुचाकीला 1000 रू. तर राँग साईड पार्कींग 500 रू. दंड आकारण्यात आला असल्याचे या मोहिमेचे प्रमुख परिवहन उपायुक्त रस्ता (सुरक्षा कक्ष ) भरत कळसकर यांनी सांगितले.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पिंपरी – 1 पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग –  231, लेन कटींग – 112, विना सिटबेल्ट – 262, राँग साईड पार्कींग – 106 गुन्हे दाखल केले आहेत.  तर पुणे – 1 पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग – 0, लेन कटींग – 248, विना सिटबेल्ट -15 , राँग साईड पार्कींग – 84 गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे – 2 पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग – 12 , लेन कटींग – 26 , विना सिटबेल्ट -16 , राँग साईड पार्कींग – 0 गुन्हे दाखल केले आहेत. पनवेल पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग – 23 , लेन कटींग – 22 , विना सिटबेल्ट -39 , राँग साईड पार्कींग -12 गुन्हे दाखल  केले आहेत. मुंबई ( मध्य ) पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग –  02 , लेन कटींग -15, विना सिटबेल्ट – 02, राँग साईड पार्कींग – 0 गुन्हे दाखल केले आहेत. तर मुंबई (पश्चिम ) पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग –  0 , लेन कटींग – 25, विना सिटबेल्ट – 31 , राँग साईड पार्कींग – 16  गुन्हे दाखल केले. अशाप्रकारे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एकूण ओव्हरस्पीडींगचे ( 268 ), लेन कटींग (448 ), विना सिटबेल्ट (365 ), राँग साईड पार्कींग (218 )  अशी दंडात्मक कारवाई केल्याची आकडेवारी आरटीओने जारी केली आहे.

मुंबई-पुणे जुना हायवेवर ( NH – 48 ) झालेल्या कारवाईत पुणे – 2 पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग – 0, लेन कटींग – 15 , विना सिटबेल्ट -34  , राँग साईड पार्कींग – 7 गुन्हे दाखल केले,  तर ठाणे – 1 पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग –  52, लेन कटींग – 02 , विना सिटबेल्ट – 06, राँग साईड पार्कींग – 5 गुन्हे दाखल केले. तर नवीमुंबई पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग – 39, लेन कटींग – 33 , विना सिटबेल्ट – 50, राँग साईड पार्कींग – 04 गुन्हे दाखल केले आहेत. तर  मुंबई ( पूर्व ) पथकाने अनुक्रमे ओव्हरस्पीडींग –  04 , लेन कटींग – 05, विना सिटबेल्ट – 25 , राँग साईड पार्कींग – 21  गुन्हे दाखल केले. तर मुंबई-पुणे जुना हायवेवर एकूण कारवाईत ओव्हरस्पीडींग ( 95 ) लेन कटींग ( 57 ) विना सिटबेल्ट (162 ), राँग साईड पार्कींग (47)  गुन्हे दाखल होऊन दंडात्मक कारवाई झाली आहे.

अपघातप्रवण क्षेत्रांचे ( ब्लॅक स्पॉट ) सर्व्हेक्षण करणे, उपाय योजना करणे, चालकांसाठी तेथे घडलेल्या अपघातांची माहिती तसेच आकडेवारी दर्शविणारे फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहून तरी वाहन चालकांना शिस्त लागावी असा हेतू आहे. या उपक्रमासाठी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची 12 पथकांची निर्मिती केली आहे. या पथकात 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यातील सहा पथके आणि 15 अधिकारी या दोन्ही महामार्गावर 24 तास कार्यरत राहणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.