Sunil Tatkare : सागरी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह, बोट घातक शस्त्रांसह कशी आली, खासदार सुनील तटकरे यांचा सवाल

श्रीवरधन भागात पारंपरिक दहीहंडी साजरी होते. लोकांनी आनंदी राहावे. कुठलीही भीती न बाळगता काळजीपूर्वक सण साजरा करावा, असं आवाहन तटकरे यांनी नागरिकांना केलं.

Sunil Tatkare : सागरी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह, बोट घातक शस्त्रांसह कशी आली, खासदार सुनील तटकरे यांचा सवाल
खासदार सुनील तटकरे यांचा सवाल
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 4:59 PM

मुंबई : रायगडमध्ये बोट आढळली. त्यामुळं राज्यात सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आलं आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. मस्कतहून युरोपला जाणारी बोट भरकटली. संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेची असल्याची माहिती देण्यात आलीय. यासंदर्भात खासदार सुनील तटकरे म्हणाले, हरिहरेश्वरच्या परिसरात (Harihareshwar area) भरकटलेली बोट सापडली. यात घातक शस्त्र यात आहेत. माझं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 1993 मध्ये बॉम्बस्फोट (Bombspot) झाले. तेव्हा शस्त्र सापडले होते. दहशतवाद्यांनी 26 – 11 ला सागरी मार्ग वापरला. एटीएस (ATS) नावाची यंत्रणा या बाबतीत काम करायला आहे. राज्य सरकारने या घटनेचा सखोल तपास करावा, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली. सागरी सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकार राज्य सरकारचे नियम असतानासुद्धा अवैध पध्दतीने अशी एक बोट सापडली. ही बोट घातक शस्त्रासह कशी आली. यंत्रणेच्या त्रृटी आहेत का, याचा तपास केला जावा. सत्य बाहेर आले पाहिजे, असंही ते म्हणाले.

नागरिकांनी काळजीपूर्वक सण साजरा करावा

खासदार सुनील तटकरे म्हणाले, मी केंद्रीय गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. अदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी हा प्रश्न सभागृहात विचारला असेलच. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता सामोरे जाऊ या. उद्या गोकुळाष्टमी आहे. श्रीवरधन भागात पारंपरिक दहीहंडी साजरी होते. लोकांनी आनंदी राहावे. कुठलीही भीती न बाळगता काळजीपूर्वक सण साजरा करावा, असं आवाहन तटकरे यांनी नागरिकांना केलं.

बोट वादळात भरकटल्याची माहिती

या बोटीचे नाव लेडी हार्न आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची बोट आहेत. ही बोट मस्कतहून युरोपकडं जात होती. या बोटीचं इंजीन निकामी झाले. खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. बोटीचे टोईंग करता आले नाही. ही बोट हरिहरेश्वर भागात आल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक याचा तपास करत आहे. सणांच्या पार्श्वभूमिवर सतर्केतेचा आदेश देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.