राहुल गांधींच्या वक्तव्याला भाजपवाल्यानीचं डोक्यावर घेतलं, आता त्यांना उत्तर द्यावच लागेल, काँग्रेस नेत्याने सगळं प्रकरणच सांगितलं…

स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते का. या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, ज्याकाळात त्यांनी देशासाठी जे काम केले आहे त्यामुळेच ते स्वातंत्र्यवीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींच्या वक्तव्याला भाजपवाल्यानीचं डोक्यावर घेतलं, आता त्यांना उत्तर द्यावच लागेल, काँग्रेस नेत्याने सगळं प्रकरणच सांगितलं...
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 8:27 PM

मुंबईः काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा माफीवीर असा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा माफीवीर म्हणून उल्लेख केल्यानंतर भाजपकडून काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर आता त्याबाबती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची आणि राहुल गांधी यांचीही बाजू मांडत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी राहुल गांधी यांनी खोटं काही सांगितलं नाही मात्र माफीवीर या विषयावर त्यांना सवाल केल्या नंतर त्यांनी थेट पुरावेच दिल्याने या विषयावर भाजपवाल्यानी वाद निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीमुळे निर्माण झालेल्या वादावर त्यांनी पडदा टाकण्याचं काम केले आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पुरावा देताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर त्यांना ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी मागितलेल्या माफीनाम्याची कागदपत्रं दाखवली.

राहुल गांधी यांनी पुरावे दाखवल्यानंतर हा विषय संपवणे गरजेचे होते मात्र भाजपसारख्या पक्षांनी ते वाढवून त्याविषयी वाद निर्माण करुन ठेवले आहेत. त्यामुळे ज्यांनी हा वाद उखरुन काढला आहे, त्यांनीच आता उत्तर दिले पाहिजे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा इतिहास सांगतान पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 1857 च्या बंडावर त्यांनी जे पुस्तक लिहिल आहे.

त्यावर ब्रिटिशांकडून खटला दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वयाच्या 28 वर्षी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी 38 व्या वर्षापर्यंत त्यांनी शिक्षा भोगल्यानंतर ब्रिटिशांकडे माफी मागितल्यामुळे त्यांची शिक्षा कमी करण्यात आली.

त्यानंतर त्यांनी ब्रिटिशांबरोबर आपण प्रामाणिक राहू वगैरे हे त्यांनी लिहून दिले होते. त्यामुळे तोच पुरावा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलताना दिला. त्यावर वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती असंही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते का. या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, ज्याकाळात त्यांनी देशासाठी जे काम केले आहे त्यामुळेच ते स्वातंत्र्यवीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचा स्वातंत्र्यवीर यांना विरोध नाही कारण इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीटही काढले होते असा इतिहासही त्यांनी सांगितला. त्यामुळे ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करताना आणि त्याविषयी बोलताना आपण तौलनिकदृष्ट्या आपण विचार केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.