राहुल गांधी यांचं सावरकरांबद्दलचं विधान, गांधी आणि सावरकर यांच्या वंशजात जुंपली

सावरकर यांनी इंग्रज सरकारला लिहिलेले अर्ज म्हणजे माफीनामा नव्हता, असंही रणजित सावरकर यांचं म्हणणंय.

राहुल गांधी यांचं सावरकरांबद्दलचं विधान, गांधी आणि सावरकर यांच्या वंशजात जुंपली
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 10:09 PM

मुंबई – वि. दा. सावरकरांबद्दल केलेल्या विधानांचा वाद चिघळत चाललाय. सावरकरांचे वंशज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन फार गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत. आता महात्मा गांधी यांच्या वंशजांनीसुद्धा राहुल गांधी यांच्या आरोपाला खरं ठरवलंय. हे मी लिहिलं नाही. सावरकर यांनी लिहिलंय, असं पत्र दाखवत राहुल गांधी म्हणाले. तर सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली होती. सावरकर यांनी माफी मागून तुरुंगातून सुटका करून घेतली होती, असं महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी म्हणतात. तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

राहुल गांधी यांनी सावरकर यांचा मुद्दा छेडताच सावरकर आणि गांधी यांचे वंशज समोरासमोर आलेत. रणजित सावरकर हे सावरकर यांचे नातू आहेत. तर दुसरीकडं तुषार गांधी हे महात्मा गांधी यांचे पणतू आहेत. रणजित सावरकर यांनी नेहरुंवर गंभीर आरोप केले.

नेहरु हे रात्री दोन नंतर माझ्या आईला पत्र लिहायचे, असं लार्ड माउंटबॅटन यांच्या मुलीनं लिहिलंय, असे दाखले देत रणजित सावरकर यांनी मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शिंदे-भाजपनं नोंदविलेल्या निषेधाला समर्थन दिलं. तसेच राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी केली.

दुसरीकडं तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभाग घेतला. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी जे म्हणाले त्याला खरं ठरविलंय. तसेच सावरकर यांच्या वंशजांवरही निशाणा साधला.

सावरकर यांच्या पत्राचा वाद आता देशाची फाळणी आणि नेहरुंच्या चारित्र्यापर्यंत गेलाय. रणजित सावरकर यांनी गंभीर आरोप केलेत. सावरकर यांनी इंग्रज सरकारला लिहिलेले अर्ज म्हणजे माफीनामा नव्हता, असंही रणजित सावरकर यांचं म्हणणंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.