Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : विधानभवनात राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मोरो आंदोलन

| Updated on: Mar 24, 2023 | 12:12 AM

राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप देशभरात आक्रमक झालीय पण विधानभवनातही त्याचे पडसाद उमटले राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत, आंदोलन केल्यानं विधानसभेत गदारोळ झाला.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : विधानभवनात राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मोरो आंदोलन
Follow us on

मुंबई : राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन भाजप देशभरात आक्रमक झालीय पण विधानभवनातही त्याचे पडसाद उमटले राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत, आंदोलन केल्यानं विधानसभेत गदारोळ झाला.

राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केलं आणि विधानसभेत खडाजंगी झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडो मारत, सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करत राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली आंदोलन झाल्यानंतर विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी केली.
शेलार

विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर, काही वेळ सभागृहाचं कामकाज स्थगित झालं पण कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा भाजपचे अतुल भातखळकर आक्रमक झाले. तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी सत्ताधाऱ्यांच्या जोडे मारो आंदोलनवर आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही जोडे मारो आंदोलनाचा निषेध करत, अशी आंदोलनं नकोत अशी मागणी केली त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.

दरम्यान, राहुल गांधी वारंवार सावरकरांवरुन वक्तव्य करतायत त्यावरुन देशभरात भाजप आक्रमक झालीय त्याचेच पडसाद विधीमंडळातही पाहायला मिळाले.