मुंबई: शिवसेनेचे गुंड अदर पुनावाला यांना धमकावतात, या वादग्रस्त वक्तव्याबद्दल ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल (Rahul Kanwal) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली. (Anchor Rahul Kanwal express regret over controversial satement about Shivsena)
काल वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मी सिरम इन्स्टिट्यूटला धमकावत असणाऱ्या नेत्याबद्दल बोललो. तो व्हीडिओ शिवसेनेच्या नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा होता. यामुळे झालेला गोंधळ आणि मनस्तापासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राहुल कनवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Yesterday while anchoring I had spoken about a video of a leader threatening Serum Institute. The video was issued by Raju Shetty who is leader of Swabhimani Shektari Sanghatana (SSS) and not a leader of the Shiv Sena (SS). The confusion and inconvenience caused is regretted.
— Rahul Kanwal (@rahulkanwal) May 3, 2021
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. राहुल कनवाल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष देसाई यांनी पत्रात केली होती.
संबंधित बातम्या:
भारतात आणखी दोन-तीन महिने लसींचा तुटवडा जाणवणार: अदर पुनावाला
केंद्राचे सुरक्षारक्षक अदर पूनावालांची रेकी करत आहेत काय?; नाना पटोलेंचा केंद्राला गंभीर सवाल
(Anchor Rahul Kanwal express regret over controversial satement about Shivsena)