सर्वात मोठा धक्का… शिवसेनेची 2018ची घटना अमान्य, राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचं वाचन सुरू
खरी शिवसेना कोणाची यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचन सुरू केलं आहे. नार्वेकर यांनी 2018 ची घटना मान्य नसल्याचं सांगत मोठा धक्का दिला आहे. 1999 ची घटना ग्राह्य धरणार असल्याचं नार्वेकरांनी वाचनात म्हटलं आहे.
मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या महानिकालाचं वाचन सुरू झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरूवातीला निरिक्षण वाचलीत. निरीक्षणाध्ये नार्वेकर यांनी2018 ची घटना अमान्य असल्याचं म्हटलं आहे. अपात्रतेचा निकाल देताना निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेत असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. 2018 ची घटना अमान्य का याबाबतही नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
दोन्ही गटाने वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नाही. निवडणूक आयोगाने एक घटना दिली, पण त्यावर तारीख नाही. 2018 ला घटनेत जी दुरुस्त केली ती चूक. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेला बदल हा निवडणूक आयोगाला कळवलेला नाही. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. 2018 सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. घटनेच्या 10 व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची?, अधिकृत व्हीप कुणाचा?, बुहमत कुणाचं हे ठरवायचं होतं, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
34 याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे. प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे. पहिल्या गटातील निरिक्षण मी वाचुन दाखवतो. सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार अध्यक्षांकडून संपूर्ण निकाल पत्र न वाचता निरिक्षण वाचली जात आहेत.
दरम्यान, घटना, पक्षीय रचना आणि विधीमंडळ पक्ष यावर हा निकाल आधारित असेल. 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं.