‘त्या’ गोष्टीमुळे ठाकरे गट अडचणीत येणार? आजपासून आमदारांच्या अपात्रतेवर कार्यवाही; विधानसभा अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर

सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल वेळेत 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यानुसार आजपासूनच विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कार्यवाहीस सुरवात केली आहे.

'त्या' गोष्टीमुळे ठाकरे गट अडचणीत येणार? आजपासून आमदारांच्या अपात्रतेवर कार्यवाही; विधानसभा अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर
rahul narvekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 11:23 AM

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर यांनी आजपासून कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. काल बैठका घेतल्यानंतर नार्वेकर हे आज ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटिसा पाठवणार आहेत. या 54 आमदारांना सात दिवसांच्या आत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात येणार आहे. या आमदारांचं म्हणणं ऐकूनच नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजपासून कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागवणार आहेत. राजकीय पक्ष कोण हे तपासण्यासाठी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना आजच नोटिसा बजावण्यात येणार आहेत. पुढील सात दिवसात भूमिका मांडण्यासाठी आमदारांना वेळ देण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाची अडचण वाढणार?

राजकीय पक्ष कोण? हे तपासण्यासाठी राहुल नार्वेकर हे दोन्ही गटाच्या घटना तपासणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. तर ठाकरे गट हा पक्ष नसून एक गट ठरला आहे. त्यामुळे नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिल्यास ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

पर्याय काय?

सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही पक्षाला आम्हीच शिवसेना आहोत असा दावा करता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाने हाच मुद्दा अध्यक्षांसमोर रेटल्यास ठाकरे गटाला त्यातून दिलासा मिळू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही असं म्हटलं आहे. त्यानुसार भरत गोगावले यांचं प्रतोदपद बाद केलं आहे. त्यामुळे कोर्टाने जो राजकीय पक्ष ग्राह्य धरला, तोच निकष या 16 आमदारांच्या कार्यवाहीत लावला तर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळू शकतो, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.