Railway News : कर्जत-सीएसएमटी व्हाया पनवेल रुट, मुंबईकरांची 25 मिनिटं वाचवणारा पर्यायी लोकल मार्ग असा तयार होतोय…

पनवेल ते कर्जत दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या मार्गासाठीच्या महत्वाच्या तीन मोठ्या बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. आता या मार्गिकेच्या इतर कामांची सरुवात झाली आहे. मध्य रेल्वेच्या या नव्या कॉरिडॉरमुळे कर्जत ते सीएसएमटीच्या प्रवाशांना सेंकड ऑप्शन मिळणार आहे.

Railway News : कर्जत-सीएसएमटी व्हाया पनवेल रुट, मुंबईकरांची 25 मिनिटं वाचवणारा पर्यायी लोकल मार्ग असा तयार होतोय...
Panvel to Karjat double line Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 3:47 PM

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मुख्य मार्गिकेवरील कल्याण पलिकडचा लोकल प्रवास धकाधकीचा बनला आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलमधून लोंबकळत जीवधोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. यामुळे ऐन उमेदीच्या काळात लोकलमधून पडून तरुणांचे मृत्यू होत आहेत. पूर्वी सरासरी दहा जणांचे लोकल तिन्ही मार्गांवर मिळून बळी जायचे आता यात थोडी सुधारणा होता सरासरी आठ जणांचा बळी जात आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प, जागेची अनुपलब्धता आणि निधीची कमतरता यामुळे ठाणे आणि कल्याण पलिकडील प्रवास जीवघेणा झाला आहे. मध्य रेल्वेच्या 29 किमीच्या पनवेल ते कर्जत ( Panvel to Karjat double line ) या नवीन उपनगरीय कॉरीडॉरमुळे रेल्वे प्रवाशांना मुंबई लवकर गाठण्यासाठी ‘सेंकड ऑप्शन’ उपलब्ध होणार आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर 28 किमीची कर्जत – पनवेल मार्गिका बांधली जात आहे. पनवेल-कर्जत ही दुहेरी रेल्वे मार्गिका आहे. या मार्गिकेवर एकूण 3,164 मीटरचे तीन बोगदे उभारले जात आहेत. त्यात सर्वात लांबीचा बोगदा क्रमांक – 2 हा ( वावर्ले 2.6 किमी ) खणण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. बोगदा क्रमांक – 3 ( किरवली टनेल 3.2 किमी ) याचे काम 30 मार्च 2024 रोजी संपले आहे. तर नाढळ बोगद्याचे काम गेल्यावर्षी 10 मे रोजी संपले होते.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने ( Mrvc ) एमयूटीपी – 3 प्रकल्पांतर्गत या बोगद्याचे काम जूनमध्यापर्यंत होणार होते. ते काही दिवस आधीच पूर्ण झाले आहे. वावर्ले टनेल याचे काम आंतरराष्ट्रीय दर्जानूसार सुरु आहे अशी माहीती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीचे बोगदे

वावरले बोगद्याचे काम 22 फेब्रुवारी 2023 रोजी सुरु झाले होते. आणि 7 जून रोजी या बोगद्याचे खणन काम संपले, दर महिन्याला 175 मीटर या वेगाने हा बोगदा खणण्यात आला. त्यासाठी ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड वापरली गेली. स्फोटके वापरून हा कातळ फोडण्यात आला. दर रोज दोन ब्लास्ट करण्यात आले. रात्रीच्या वेळी स्फोट करण्यास निर्बंध असल्याने ती काळजी घेत हे काम करण्यात आले.

बोगद्यात बलास्ट लेस ट्रॅक

या तीन बोगद्यात बलास्ट लेस रेल्वे ट्रॅकचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या रेल्वे रुळांच्या खाली पारंपारिक पद्धतीने खडी अंथरलेली जाणार नसून संपूर्ण सिमेंट कॉंक्रीट थरावर एलिवेटेड मेट्रोप्रमाणे किंवा बुलेट ट्रेनप्रमाणे थेट रुळ टाकले जाणार आहेत. पनवेल ते कर्जत ही मार्गिका पुढील वर्षी डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

मुख्य मार्गिकेवर बिघाड झाल्यास वापरता येणार

पनवेल – कर्जत नवीन उपनगरीय कॉरीडॉरसाठी 2,782 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कर्जतहून थेट सीएसएमटी व्हाया पनवले मार्गे येता येणार आहे. त्यामुळे कधी मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गिका कर्जत ते सीएसएमटी यावर काही कारणाने बिघाड झाल्यास कर्जतकडील प्रवाशांना पनवेलवरुन हार्बर मार्गाने मुंबई सीएसएमटी स्थानक गाठता येणार आहे. या मार्गाने प्रवाशांची 25 मिनिटांची बचत होणार आहे.

नव्या पाच स्थानकांची भर पडणार

सध्या हा मार्ग एकेरी असून त्यांची पिकअवरमध्ये त्याची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे त्याला दुहेरी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावर सध्या मालगाड्या धावतात त्यावर उपनगरीय लोकल फेऱ्या अधिक कार्यक्षमतेने चालविण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवाशांना पर्यायी मार्ग देखील मिळणार आहे. कल्याण मार्गे मुंबई सीएसएमटीला जाण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळ कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल या मार्गिकेसाठी लागणार आहे.

 पनवेल ते कर्जत मार्गावर ही पाच स्थानके येणार

1 ) मोहोपे

2 ) चौक

3 ) कर्जत

4 ) चिखले

5 ) पनवेल

महत्वाचा टप्पा पार झाला

कल्याणवरुन पनवेलमार्गे लोकलने सीएसएमटीला पोहोचण्यासाठी हा मार्ग अत्यंत खुष्कीचा असणार आहे. या मार्गाचे काम एमयुटीपी – 3 अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत आहे. या रेल्वेमार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या वावर्ले बोगद्याचे ( wavarle tunnel ) काम आता पूर्ण झाले आहे. हा बोगदा जून मध्यपर्यंत तयार होणार होता. मात्र, मुंबई रेल्वे विकास मंडळाने हे काम मुदतीआधीच पूर्ण केले आहे. वावर्ले बोगदा हा पनवेल-कर्जत रेल्वे ( Mumbai Panvel Railway ) मार्गातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे आता या रेल्वेमार्गाच्या कामाला आणखी वेग मिळणार आहे. त्यामुळे लवकरच कर्जतच्या आजूबाजूच्या छोट्या गावातील चाकरमान्यांना लोकल ट्रेनने ( Local Train ) पनवेलमार्गे मुंबई सीएसएमटी गाठता येणार आहे.

अशी वाचतील प्रवासाची मिनटं

मुंबईकरांच्या दृष्टीने एक-एक मिनिटं महत्वाची असतात.  पनवेल ते कर्जत एकूण 29.6 किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी घसघशीत बचत होईल. सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने प्रवासासाठी तब्बल 2 तास 19 मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्यास हा लोकल प्रवास 1 तास 50 मिनिटांचा होईल. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाची चक्क 25 मिनिटं वाचतील.

मोठ्या लोकसंख्येला फायदा

पनवेल-कर्जत हा दुहेरी रेल्वे मार्गावर दोन उड्डाणपूल, आठ मोठे पूल, 36 लहान पूल उभारले जात आहेत. पनवेल ते कर्जत या पट्ट्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. कर्जत ते मुंबई आणि पुण्याला जोडणारे मुख्य ठिकाण आहे. मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनने कर्जत ते मुंबईशी जोडले गेलेले आहे. मात्र, पनवेल ते कर्जत या भागात फक्त रस्ते वाहतूक हा पर्याय उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पनवेल आणि कर्जत या दोन्ही भागांमध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. परिणामी पनवेल ते कर्जत लोकल ट्रेनची सेवा सुरु झाल्यास स्थानिक नागरिक आणि मुंबईतील चाकरमान्यांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. याशिवाय, कर्जत आणि पनवेल पट्ट्यातील लहान गावांमधील लोकांना नोकरी आणि अन्य कामांसाठी मुंबई गाठणे सोपे होणार आहे.

पनवेल ते कर्जत दुपदरीकरण एक दृष्टीक्षेप

मंजूर खर्च  – 2782 कोटी रुपये

कामाची प्रगती  : 50%

पूर्ण करण्याचे टार्गेट  : डिसेंबर 2025

विरार ते डहाणू चौपदरीकरणास दोन वर्षांची प्रतिक्षा

मुंबई- पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम साल गेल्यावर्षीपर्यंत केवळ 23 टक्के पूर्ण झाले होते. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सध्या वैतरणा नदीवर ब्रिज बांधण्याचे काम सुरु आहे. या मार्गावर सध्या चर्चगेट ते डहाणू अशा दिवसभरात एकूण 8 लोकल चालविण्यात येतात. विरार ते डहाणू सध्या दोनच मार्गिका असल्याने येथे खूपच मर्यादीत लोकल धावत आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम झाल्यास लोकल गाड्यांची संख्या वाढविता येणार आहे. त्यामुळे मुंबईत कामाला येणाऱ्या प्रवाशांच्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

विरार ते डहाणू चौपदरीकरणासाठी 100 टक्के जमीन संपादन पूर्ण झाले आहे. परंतू कोरोनाकाळामुळे या ठिकाणचे नदी पुल बांधण्याचे काम संथ गतीने सुरु होते. त्यामुळे हा प्रकल्प आता येत्या डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. येथे सरकारी, खाजगी आणि वन जमिन संपादनात करण्यात तसेच तिवरांच्या जंगलामुळे पर्यावरणीय परवानगी मिळविण्याचे काम जिकीरीचे होते.

या प्रकल्पाच्या 31 प्रकल्पा आराखडे, दोन महत्वाचे ब्रिज, 16 मेजर ब्रिज तर 67 छोटे ब्रिज यांची मंजूरी मिळाली आहे. पर्यावरण आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल देखील आला आहे. शिवाय इतर पर्यावरणीय मंजूरी शिवाय या प्रकल्पासाठी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( NPCIL ) कडून देखील बांधकामासाठी मंजूरी मिळाली, जो एक महत्त्वपूर्ण अडसर दूर झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन वर्षांनी पूर्ण होणार असे म्हटले जाते.

विविध स्थानकांवर बांधकामे सुरू आहेत

विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, डहाणू रोड, उमरोली यासह विविध स्थानकांवर बांधकाम सुरू आहेत. यामध्ये स्टेशन इमारती,सर्व्हीस इमारती, कर्मचारी निवासस्थान आणि प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. पूल क्रमांक 137 येथील वाणगाव-बोईसर विभागासह विविध ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

भविष्यात आठ नवीन स्थानके येणार

विरार ते डहाणू हा 64 कि.मी.चा मार्ग असून त्यावर सध्या 9 स्थानके आहेत. भविष्यात येथे आणखी 8 नवीन स्थानकांचा समावेश होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बोरीवलीच्या नंतर विरारच्या पुढे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेने बोरीवली ते विरार दरम्यान लोकल फेर्‍या वाढवूनही त्या अपुर्‍या पडत आहेत. सध्या विरार ते डहाणू रोड येथे मेमू, शटल फेर्‍या आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या चालतात. या ठिकाणी चार मार्गिका तयार झाल्यास येथेही लोकलच्या फेर्‍या वाढविणे शक्य होणार आहे.

सध्या विरार-डहाणू मार्गावर विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वनगाव आणि डहाणू रोड अशी नऊ स्थानके आहेत. या स्थानकांदरम्यानचे अंतर किमान आठ किलोमीटर तर कमाल 12 किलोमीटर एवढे आहे. नवीन आठ स्थानके झाल्यास दर तीन ते चार कि.मी.वर एक स्थानक असे प्रमाण होईल.

ही आहेत नवीन स्थानके

1 ) वाधीव, 2 ) सरतोडी, 3 ) माकुनसार, 4 ) चिंतुपाडा, 5 ) खराळे रोड, 6 ) पंचाली, 7 ) वंजारवाडा, 8 ) बीएसईएस कॉलनी

एकूण 30 गावांची जमिन संपादन

विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्पासाठी 3,555 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूण 126 कि.मी.चे रूळ टाकावे लागणार आहेत. एकूण 30 गावांमध्ये भूसंपादन झाले असून पालघरमधील 20, वसईची 6 तर डहाणूच्या 4 गावांची जमीन संपादन केली आहे. प्रकल्पासाठी एकूण 180 हेक्टर जमीन आवश्यक असून 32.78 हेक्टर खाजगी,11.06 हेक्टर राज्य सरकारची तर 3.78 हेक्टर वनजमीन अशी एकूण 42.67 हेक्टर जमीन संपादन करावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

विरार ते डहाणू चौपदरीकरण

मंजूर खर्च : रु. 3578.00 कोटी

डिसेंबर 2023 पर्यंत झालेला खर्च : रु 825.27 कोटी

जमीनीचे शंभर टक्के संपादन पूर्ण

प्रगती : डिसेंबर 2023 पर्यंत 23 %

पूर्ण होण्याची तारीख : डिसेंबर 2026

MUTP-III चे रखडलेले प्रकल्प आणि त्यांचा खर्च

पनवेल – कर्जत दुपदरीकरण ( Panvel to Karjat double line ) – Rs. 2,783 crores

विरार ते डहाणू चौपदरीकरण ( Virar to Dahanu quadrupling) – Rs. 3,578 crores

ऐरोली ते कळवा एलिवेटेड लिंक ( Airoli to Kalwa Link Road – Rs. 476 crores

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.