मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून या दोन्ही मार्गांवर मिळून लोकलच्या 610 फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मिळून दिवसाला लोकलच्या 1410 फेऱ्या होतात. मात्र, आता ही संख्या 2020 इतकी केली जाणार आहे. लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, वातानुकूलित आणि लेडीज स्पेशल गाड्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. (Central and Western railway increase daily services in Mumbai)
मध्य रेल्वे मार्गावर सध्या ७०६ लोकल फेऱ्या चालवल्या जात असून त्यात ३१४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या १०१० इतकी झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या ७०४ फेऱ्या होत असून त्यात २९६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या आता १००० होणार आहे.
Railways to run 610 more daily special suburban services in Mumbai from 1st Nov, taking the total number of services to 2020. This will help maintain social distancing, avoid overcrowding & enhance passenger convenience: Union Railway Minister Piyush Goyal (file pic) #COVID19 pic.twitter.com/jdz6JwFIcX
— ANI (@ANI) October 31, 2020
लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यात असली तरी सामान्य लोकांना अजूनही ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. सुरुवातीला केवळ डॉक्टर, नर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये खासगी आणि सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना तसेच वकील, खासगी सुरक्षा रक्षक आणि महिला प्रवाशांना काही अटींवर लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
उद्या रविवारचा मेगाब्लॉक आधी जाहीर केल्यानुसार असेल व त्यानुसार लोकल धावतील, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रवाशांनी वैद्यकीय व सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले.
संबंधित बातम्या:
लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा
लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?
Corona Care | केमिकल फवारणी करुन लोकल ट्रेनची साफसफाई
(Central and Western railway increase daily services in Mumbai)