CM Eknath Shinde: पावसाळ्यात रेल्वे बंद पडल्या तर बेस्ट, एसटीकडून सेवा देणार; नागरिक, महिलांची फरफट होऊ देणार नाही
बंद होणाऱ्या रेल्वेमुळे फटका बसणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांना कामावरून पुन्हा घरी परतण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात बेस्ट आणि एसटी महामंडळाला सांगून बसची उपाय योजना करण्याची सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबईतील अधिकाऱ्यांबरोबरच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांबरोबरही संवाद साधला असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाणी साचणारे जे 25 स्पॉट (25 Block Spot) आहेत, त्या स्पॉटबद्दल माहित घेतली.
@mybmc च्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाची परिस्थिती तसेच या संबंधित घ्यावयाला लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मुंबईतील पावसाची सद्यपरिस्थिती आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना यांची यासमयी सविस्तर माहिती दिली. pic.twitter.com/X8zkFeMhVd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
त्यामुळे बंद होणाऱ्या रेल्वेमुळे फटका बसणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांना कामावरून पुन्हा घरी परतण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात बेस्ट आणि एसटी महामंडळाला सांगून बसची उपाय योजना करण्याची सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेकडून उपाय योजना
यावेळी त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात मुंबई महानगरपालिकेकडून कोण कोणत्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत त्याचीही माहिती दिली.
बेस्ट आणि एसटीची सोय
पावसाळ्याच्या दिवसाता मुंबईकरांना मोठा फटका बसतो,पावसाचे पाणी रस्ते आणि रुळावर येत असल्याने अनेकांना कामावरून घरी जाताना हाल सोसावे लागतात. त्यामध्ये महिलांचे मोठ हाल होत असल्याने त्यांच्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात ज्या ठिकाणी रेल्वेचा खोळंबा होईल त्या ठिकाणापासून बेस्ट आणि एसटीची सोय करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री यांनी मुंबईसह राज्यातील पावसाच्या परिस्थितीचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. यावेळी त्यांनी राज्यातील पावसाची परिस्थिती, पूरस्थिती काय आहे, कोणत्या भागात किती पाऊस झाला आहे आणि नदीची पाण्याची पातळीची परिस्थिती काय आहे याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याचा माहिती घेतली.