Raj Thackeray Convoy Accident : राज ठाकरेंच्या ताफ्यात अपघात काही नवीन गोष्ट नाही! ही आकडेवारी बघाच
राज ठाकरेंच्या ताफ्यात सामीन झालेल्या या गाड्याही एकापेक्षा एक होत्या. क्रेटा, इनोव्हा, अर्टीगा, स्विफ्ट, असा दर्जेदार गाड्यांच्या दर्शनी भागाचं या अपघातात नुकसान झालंय.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Convoy) यांची गाडी, त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा ताफा आणि जोरदार शक्तिप्रदर्शनं हे महाराष्ट्रात (Maharashtra Navnirman Sena) नवं नाही. राज ठाकरे जिथे जातील, तिथं त्यांच्या मागे त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं गेले नाहीत, तरच नवल! तसंच होतं आलंय. तसंच होत राहिलं, तर नवलही वाटण्याचं कारण नाही. आता औरंगाबादेत (Raj Thackeray Aurangabad Accident) राज ठाकरेंची सभा होणं, त्यासाठी शेकडोंच्या संख्येनं महाराष्ट्रभरातून त्यांचा चाहता वर्ग, कार्यकर्ते येणं, हेही होणारच होतं. तब्बल शंभर पेक्षा जास्त गाड्यांचा ताफा राज ठाकरेंच्या सोबत औरंगाबादच्या दिशेनं कूच करत होता. या दृश्याची फक्त कल्पना करता येऊ शकते. सटासट, सुसाट, एकामागोमाग एक शंभरहून अधिक गाड्या, एकत्र जाणं एखाद्या सिनेमासारखंच दृश्य आहे. माध्यमांचे कॅमेरेही हे दृश्य टिपण्यासाठी तैनात होतेच. पण या सगळ्याला गालबोट लावणारी एक घटना घडली.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील जवळपास आठ ते दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. करकचून ब्रेक लागल्याचा परिणाम बाकीच्या गाड्यांनाही भोवला. मागून येणाऱ्या गाड्याची एकमेकांवर आदळल्या. गाड्याच्या बोनेटचं यामध्ये नुकसान झालं. आणि औरंगाबादला जाण्याच्या संपूर्ण दौऱ्यावरतही खोडा झाला. पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ तर टळला आहेच. पण एक बाब यानिमित्तानं पुन्हा अधोरेखित झाली. ती म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या ताफ्याचे अपघात हे काही नवे नाहीत.
औरंगाबादला जातेवेळी मनसेचे कार्यकर्ते आपआपल्या गाड्या घेऊन निघाले होते. राज ठाकरेंच्या ताफ्यात सामीन झालेल्या या गाड्याही एकापेक्षा एक होत्या. क्रेटा, इनोव्हा, अर्टीगा, स्विफ्ट, असा दर्जेदार गाड्यांच्या दर्शनी भागाचं या अपघातात नुकसान झालंय.
बघा रे तो व्हिडीओ :
3 वर्षांपूर्वीही अपघात!
दरम्यान, तीन वर्षांपूर्वीही राज ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झााल होता. तारीख होती 5 ऑक्टोबर 2019. शर्मिला ठाकरे आणि त्यांच्या बहिणीला या अपघातात किरकोळ दुखापत झाली होती. या अपघातात इनोव्हा कारच्या दर्शनी भागाचं नुकसान झालेलं. एक रिक्षा आडवी आल्यानं तिला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला होता. मागून येणाऱ्या गाडीनं हा अपघात झाला होता. मुंबईच्या दिशेने राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा येत असताना हा अपघात झाला होता.
बघा रे तो व्हिडीओ :
महिन्याभरापूर्वी नवी मुंबईत..
दुसरीकडे महिन्याभरापूर्वी नवी मुंबईत राज ठाकरेंची रॅली निघाली होती. त्यादरम्यानही, एक अपघात झाला होता. बाईकवरुन जाणाऱ्या दोघे रस्त्यावर रॅलीदरम्यान पडले होते. यावेळी रस्त्यावर असलेल्या क्रेटा कारच्या खाली जाता जाता थोडक्यात ते वाचले होते. रस्त्यावर रेती असल्यामुळे ही बाईक स्लिप झाली होती आणि बाईकस्वार खाली पडले होते. दोघांना अगदी किरकोळ मार लागला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी गाडीत बसूनच नेमकं काय झालं, याची चौकशी केली होती.
बघा रे तो व्हिडीओ :
येताना सावकाश या!
दरम्यान, राज ठाकरेंची सभा झाल्यानंतर औरंगाबादेत सभेसाठी गेलेल्या राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांना सावकाश येण्याचं आवाहन केलं जातंय. राज्यात गेल्या काही दिवसांत रस्ते अपघातांचं प्रमाण चिंतजनक आहे. रस्ते अपघातातील बळींमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी येताना सावकाश या, असं आवाहन केलं, तर आश्चर्य वाटायला नको.