Video : राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदूहृदयसम्राट! घाटकोपरमधल्या बॅनरची चर्चा तर होणारच
हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे (Raj Thackeray) अशा अशायचे बॅनर घाटकोपरमध्ये लागल्याने या बॅनरची महाराष्ट्रभर चर्चा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदूहृदयसम्राट (Hindurhidaysamrat) म्हणत, आता मनसेने हिंदूत्त्वचा मुद्दा हाती घेऊन थेट राज ठाकरे यांनाच हिंदूहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून देश फक्त एक हिंदूहृदयसम्राट पाहत आलाय. त्यांना ऐकत आलाय, ते म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना. मात्र आता दुसरे हिंदूहृदयसम्राट चांगलेच चर्चेत आले आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, महाराष्ट्रातले दुसरे हिंदूहृदयसम्राट कोण? याच प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधलंय. हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे (Raj Thackeray) अशा अशायचे बॅनर घाटकोपरमध्ये लागल्याने या बॅनरची महाराष्ट्रभर चर्चा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदूहृदयसम्राट (Hindurhidaysamrat) म्हणत, आता मनसेने हिंदूत्त्वचा मुद्दा हाती घेऊन थेट राज ठाकरे यांनाच हिंदूहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे. आज घाटकोपर मध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन आहे. यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. आणि हेच बॅनर आता चांगलेच चर्चेत आले आहेत. मागेही एकदा असेच बॅनर ठाण्यात लागले होते, त्यावेळी मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका म्हणून राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावले होते. आता राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राला नवे हिंदूहृदयसम्राट मिळाले?
या बॅनरवरील मजकुरात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना, आता मनसेने शिवसेनेचा हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हिंदूहृदसम्राट म्हंटल्याने महाराष्ट्रला आता आणखी एक नवे हिंदूहृदयसम्राट मिळाले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडवार मनसे पुन्हा कमबॅम करण्यासाठी कंबर कसून कामला लागली आहे. खुद्द राज ठाकरे पुणे, नाशिक औरंगाबद, पिजून काढत आहे. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. निवडणुकीची रणनिती आखत आहेत. मुंबईतही मनसे जोमाने कामाला लागली आहे.
बाळासाहेबांसारखीच उपाधी राज ठाकरेंना
राज्यात भाजपची साथ सोडून शिवसेना काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत बसली. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, मात्र सत्तेसाठी शिवसेने हिंदूत्व सोडल्याची टीका भाजपकडून सतत होत असताना नेमका त्याच वेळेला मनसेने हिंदूत्वाचा मुद्दा अधिक जोराने लावून धरला. एवढच काय मनसेने पक्षाचा झेंडाही बदलत भगवा केला. त्यामुळे महाराष्ट्रात मनसेकडून हिंदूत्वाच्या मुद्दा अधिक रेटून धरला जाणार हे केव्हाच स्पष्ट झालं होते. मात्र आता चक्क राज ठाकरेंच्या नवापुढे हिंदूहृदयसम्राट दिसून आल्याने या चर्चा वेगळ्या वळणावर येऊन ठेपल्या आहेत. शिवसैनिकांनी बाळासाहेबांना जी उपादी दिली होती, तीच उपाधी मनसे आता राज ठाकरेंना यापुढेही देणार का? असा सवाल विचारला जाणं सहाजिकच आहे.
Video | कुडाळमध्ये भांडले सेना-भाजप आणि मलाई काँग्रेसला! सेना-भाजपच्या राड्याचं फलित काय?