“बसलेला माणूस टेम्पररी”; राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणाकडे, मुलाखतीतून जोरदार फटकेबाजी

राजकीय नेत्यांसाठी पोलीस अधिकऱ्यांना जेलमध्ये जाणं परवडणारंही नाही म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांवर टीका करताना खुर्ची बसलेला माणूस टेंपररी आहे असा टोलाही त्यांनी राजकीय नेत्यांना लगावला आहे.

बसलेला माणूस टेम्पररी; राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणाकडे, मुलाखतीतून जोरदार फटकेबाजी
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 9:27 PM

मुंबई : “ज्या वेळी मराठीला नख लावाल त्यावेळी मी मराठी म्हणून मी अंगावर येईन आणि माझ्या धर्माला ज्यावेळी नख लावाल त्यावेळी मी हिंदू म्हणून मी तुमच्या अंगावर येईन”, असा इशारा देत राज ठाकरे यांनी आज दिलेल्या मुलाखतीमध्ये अगदी उद्धव ठकारे यांच्यापासून ते अगदी नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत टीका टिप्पणी केली आहे. यावेळी राज ठाकरे यांना खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर विविध प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे यांनीही अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.

राज ठाकरे यांनी या मुलाखतीत बोलताना राजकीच टीका करताना थेट कुणावरही टीका केली नाही मात्र काही खोचक सवालही त्यांनी उपस्थित केले.

राज ठाकरे यांना अमृता फडणवीस यांनी अनेक सवाल केले त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न विचारला तो तुमच्या आंदोलनामध्ये राजकीय आशयापेक्षा सामाजिक आशय जास्त दिसून येतो असा सवाल केल्या नंतर त्यांनी भोंग्यांचं आंदोलन यशस्वी आंदोलनावरही त्यांनी टीका टिप्पणी केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत मुंबई पोलिसांबरोबरच त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा त्यांनी आपल्या शब्दात गौरव केला. यावेळी त्यांनी सांगितले की, मला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवण्यापेक्षा पोलीस अधिकाऱ्यांना एक दिवस मुख्यमंत्री बनवा.

महाराष्ट्र पोलिसांना जर तुम्ही 48 तास दिले तर तेच महाराष्ट्र साफ करतील अशा शब्दात त्यांनी पोलिसांचा गौरव केला आहे. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, मात्र त्यांना आदेश नसल्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

कारण कारवाई केली तर राजकीय नेत्यांसाठी पोलीस अधिकऱ्यांना जेलमध्ये जाणं परवडणारंही नाही म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांवर टीका करताना खुर्ची बसलेला माणूस टेंपररी आहे असा टोलाही त्यांनी राजकीय नेत्यांना लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांच्यापासून ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत एका वाक्यात त्यांनी सल्ला दिला आहे. त्यामुळेही जोरदार हशा पिकला होता.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.