Raj Thackeray : माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो; राज ठाकरे यांचं आवाहन
जे टोल नाके बंद झाले, त्यांनी आशीर्वाद दिले. सत्ता हातात द्या, बाकीचे टोलनाके बंद करतो. या सर्वांना टोलवाल्यांकडून पैसे जातात. त्यामुळे ते टोलनाके बंद करत नाही. विषयही काढत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसे हा पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो. त्यांनी एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. टोलचं आंदोलन. 65 ते 67 टोल आपण बंद केले. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके (Toll plaza) बंद करतो, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते मुंबईत बोलत होते. टोलवरून त्यांनी महाविकास आघाडीसह भाजपावर टीका केली. टीका केली. सेना भाजपाच्या (BJP) जाहीरनाम्यात म्हटलं होतं, टोलमुक्त महाराष्ट्र करू. त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार. मला वाटतं या गोष्टी तुम्हाला जिल्हा तालुक्यात शहरात बोलतता तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही एवढे टोल बंद केले. तुमच्या पक्षांनी काय केलं. आश्वासन देऊनही तुम्ही बंद केलं नाही हे सांगितलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
‘टोलचा पैसा कुणाकडे जातो’
मला वाटते काही गोष्टी तुमच्याकडून लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमे अनेक राजकीय पक्ष जाणून बुजून काही गोष्टींचा प्रचार करत असतात. तुम्ही सक्षम आहात, असे राज ठाकरे म्हणाले. टोलवरून त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. आपला पहिला मुद्दा होता तो हा की टोल. जगभरात टोल. टोलवर पैसा गोळा करतो. त्यातून ब्रिज आणि रस्त्याची रक्कम गोळा करतात. आपला प्रश्न होता हे टोल किती वर्ष राहणार आणि किती पैसे गोळा होतात. ती कुणाकडे जातो. ही कॅश रोज कुणाकडे जाते. त्याचं पुढे होतं काय. याची कोणतीही उत्तरं आजपर्यंत सरकारकडून दिली गेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
‘कोणी प्रश्न विचारत नाही’
जे टोल नाके बंद झाले, त्यांनी आशीर्वाद दिले. सत्ता हातात द्या, बाकीचे टोलनाके बंद करतो. या सर्वांना टोलवाल्यांकडून पैसे जातात. त्यामुळे ते टोलनाके बंद करत नाही. विषयही काढत नाहीत. हे कधी त्यांना प्रश्नही विचारत नाही. इतक्या पत्रकार परिषदा होतात. पण कोणी प्रश्न विचारत नाही. पण त्यांचे छुपे लोक आपल्याबद्दल प्रचार करतात, असे राज ठाकरे म्हणाले. आजपर्यंत आपल्या पक्षांनी जेवढी आंदोलने केली तेवढी आंदोलने कोणी केली नाही. आम्ही केली आणि ती यशस्वी केली, असा दावा करत काढा सर्व पक्षांचा इतिहास असे ते म्हणाले.